तात्यासाहेब कोरे यांच्या २८ व्या स्मृतीदिनी अभिवादन / | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तात्यासाहेब कोरे यांच्या २८ व्या स्मृतीदिनी अभिवादन /
तात्यासाहेब कोरे यांच्या २८ व्या स्मृतीदिनी अभिवादन /

तात्यासाहेब कोरे यांच्या २८ व्या स्मृतीदिनी अभिवादन /

sakal_logo
By

03407
वारणानगर : येथे तात्यासाहेब कोरे समाधीचे पूजन करताना आमदार डॉ. विनय कोरे. यावेळी उपस्थित विश्वेश कोरे, प्रतापराव पाटील, एच. आर. जाधव.
डॉ. प्रताप पाटील व इतर.
........................

तात्यासाहेब कोरे यांच्या
२८ व्या स्मृतिदिनी अभिवादन

वारणानगर, ता. १४ : येथील वारणा उद्योग व शिक्षण समूहाचे संस्थापक सहकारमहर्षी स्व. तात्यासाहेब कोरे यांच्या २८ व्या स्मृतिदिनी विविध उपक्रमांनी अभिवादन करण्यात आले. सकाळी समाधीपूजन, सद्‌भावना दौड आणि अमर रहे, अमर रहे.. तात्यासाहेब कोरे अमर रहे... घोषणांनी परिसर दणाणला.
वारणा शेतकरी कार्यालयासमोरील तात्यासाहेब कोरे समाधीचे पूजन आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी वारणा बँकेचे अध्यक्ष निपुण कोरे, वारणा भगिनी मंडळाच्या उपाध्यक्षा स्नेहाताई कोरे, सावित्री महिला संस्थेच्या अध्यक्षा शुभलक्ष्मी कोरे, श्रुती कोरे, विश्वेश कोरे, जोतिरादित्य कोरेंसह कोरे कुटुंबीय व वारणा उद्योगसमूह आणि कार्यकर्त्यांनी समाधीचे दर्शन घेवून आदरांजली वाहिली.
वारणा परिसरातील शंभरहून अधिक गावांतून हजारोंच्या संख्येने आलेल्या स्मृतिज्योत सद्‌भावना दौडीचे वारणा शिक्षण मंडळ संकुलात आमदार डॉ. विनय कोरे यांनी स्वागत केले. यावेळी कोरे कुटुंबीय, वारणा शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम, प्राचार्य, प्राध्यापक उपस्थित होते. यानंतर कोरेंच्या समाधीजवळील मुख्य स्मृतिज्योत प्रज्वलीत केली.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, कार्यकारी संचालक शहाजी भगत, दूध संघाचे उपाध्यक्ष एच.आर. जाधव, कार्यकारी संचालक मोहन येडूरकर, जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, नेते अशोकराव माने, जिल्हा बँक संचालक विजयसिंह माने, पश्चिम महाराष्ट्र सहकार परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रताप पाटील, विशांत महापुरे, वारणा बँकेचे उपाध्यक्ष उत्तम पाटील, बझारचे सरव्यवस्थापक शरद महाजनसह संचालक, अधिकारी उपस्थित होते.