कोरे अभियांत्रिकी विद्यापीठ नियतकालिक स्पर्धेत प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरे अभियांत्रिकी विद्यापीठ नियतकालिक स्पर्धेत प्रथम
कोरे अभियांत्रिकी विद्यापीठ नियतकालिक स्पर्धेत प्रथम

कोरे अभियांत्रिकी विद्यापीठ नियतकालिक स्पर्धेत प्रथम

sakal_logo
By

03428
कोल्हापूर : ''होरायझन'' नियतकालिकाने प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल प्रा. लोखंडे यांचा सत्कार करताना प्रभारी कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील. सोबत इतर मान्यवर.
----------------------------

नियतकालिक स्पर्धेत
कोरे अभियांत्रिकी प्रथम
वारणानगर, ता. २१ : येथील तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या (ऑटोनॉमस) ‘होरायझान’ नियतकालिकाने शिवाजी विद्यापीठ संलग्न महाविद्यालयीन नियतकालिक स्पर्धा २०१८-१९ शैक्षणिक वर्षात व्यावसायिक गटात प्रथम क्रमांक मिळवला.
प्राचार्य डॉ. एस. व्ही आनेकर म्हणाले, ‘अभियांत्रिकीचे विद्यार्थी असूनही ते किती सृजनशील, निर्मितीक्षम व सामाजिक बांधीलकी जोपासणारे आहेत हे दाखवून दिले.’ संस्थाध्यक्ष, डॉ. विनय कोरे व प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम यांनी अभिनंदन केले. संपादक डॉ. बी. टी. साळोखे, सहसंपादक, प्रा. पी. व्ही. लोखंडे, प्रा. डॉ. एन. एस. धाराशिवकर, प्रा. गणेश कांबळे, डॉ. मार्क मोनीस,डॉ. के. आय. पाटील व प्रा. आर. बी. पाटील, ऋषिकेश खाडे, निकिता टर्नर, राकेश पाटील व समितीने परिश्रम घेतले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २०१८-१९ शैक्षणिक वर्षाचा निकाल जाहीर झाला. स्पर्धेसाठी नियतकालिकांचे एकूण स्वरूप, छपाई, मांडणी इत्यादींचे मूल्यमापन त्या त्या विषयातील तज्ज्ञांकडून विद्यापीठामार्फत करून घेतले जाते. यशस्वी पहिल्या तीन महाविद्यालयांना सन्मानचिन्हे आणि विद्यार्थ्यांना व्यक्तिगत पारितोषके व प्रशस्तीपत्र देऊन प्र-कुलगुरुंच्या हस्ते गौरविले.