वाठार-वारणानगर रस्ता त्वरित करा अन्यथा आंदोलन वाहतुकीस प्रचंड अडथळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाठार-वारणानगर रस्ता त्वरित करा अन्यथा आंदोलन   वाहतुकीस प्रचंड अडथळा
वाठार-वारणानगर रस्ता त्वरित करा अन्यथा आंदोलन वाहतुकीस प्रचंड अडथळा

वाठार-वारणानगर रस्ता त्वरित करा अन्यथा आंदोलन वाहतुकीस प्रचंड अडथळा

sakal_logo
By

03441
अमृतनगर : वाठार-वारणानगर रस्त्यावर पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. (छायाचित्र ः संजय पाटील, घुणकी)
--------------------

वाठार-वारणानगर रस्ता
दुरुस्ती त्वरित करावी

घुणकी, ता. २९ : वाठार-वारणानगर मार्गावरील पावसाळ्यानंतर खड्डे बुजवण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने केले. मात्र पुन्हा खड्डेच पडले आहेत. त्यामुळे दुचाकीस्वारांचे अपघात होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता त्वरित नवीन करावा, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.
पुणे-बंगळूर महामार्गावरील वाठार चौकातून रत्नागिरीकडे जाण्यासाठी वाठार-वारणानगर-बोरपाडळे हा जवळचा मार्ग आहे. पुणेसह मिरज, सांगलीहून हातकणंगले, पेठवडगावमार्गे अवजड वाहने या मार्गावरून कोकणात जातात. मार्गावर पेठवडगाव, कोडोली बाजारपेठ, शैक्षणिक, सहकारी संस्थांचे जाळे आहे. वारणा उद्योग व शिक्षणसमूह आहे. यामुळे मार्गावरून वाहतुकीची वर्दळ असते. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे.
पावसाळ्यात खड्डे पडल्याने रस्त्याची चाळण झाली होती. अमृतनगरपर्यंत हातकणंगले सार्वजनिक बांधकाम विभागाची हद्द असून अमृतनगरपासून पुढे पन्हाळ्याची हद्द सुरू होते. त्यामुळे दोन तालुक्यांतील सार्वजनिक बांधकाम विभाग रस्त्याचे काम पाहतात. खड्डेमय परिस्थितीचे छायाचित्रासह वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर हातकणंगलेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे मुजविले होते. हंगामामुळे ऊसवाहतूक वाहनांची गर्दी होत असून खड्ड्यांचा वाहनधारकांना नाहक त्रास होत आहे.
--------
प्रतिक्रिया
वाठार-अममृतनगर नवीन रस्ता मंजूर आहे. निविदा प्रसिद्ध झाली. लोकप्रतिनिधींना विशिष्टच कंत्राटदार हवा असल्याने रस्ता रखडला आहे. आठ दिवसांत रस्त्याचे काम सुरू न झाल्यास सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांच्या दालनासमोर आंदोलन करणार आहे.
- प्रदीप राजाराम देशमुख, माजी सदस्य, पंचायत समिती, हातकणंगले
------------

रस्ता मंजूर आहे. अंतिम मंजुरी आल्यानंतर त्वरित काम सुरू केले जाईल.
- एस. आर. पाटील, शाखा उपअभियंता, सार्व. बांधकाम हातकणंगले