
१२ जानेवारीला वारणानगर येथे स्व. तात्यासाहेब कोरे चषक सामान्य ? आयोजन
वारणानगरला १२ जानेवारीस
कोरे चषक सामान्यज्ञान स्पर्धा
वारणानगर, ता. ३१ : येथे १२ जानेवारी २०२३ वारणा सहकारी बँक, तात्यासाहेब कोरे क्रीडा प्रबोधनी वारणानगर पुरस्कृत व वारणा युवक संघटना आयोजित आंतरमहाविद्यालयीन निमंत्रित राज्यस्तरीय वैयक्तिक व सांघिक तात्यासाहेब कोरे चषक सामान्यज्ञान स्पर्धा सकाळी ९.०० वाजता वैयक्तिक लेखी परीक्षा व सांघिक स्पर्धा य. च. वारणा महाविद्यालय, वारणानगर यांच्या सहकार्याने होणार आहेत. स्पर्धेचे ३५ वे वर्ष आहे. यामध्ये यशस्वी वैयक्तिक लेखी परीक्षेस व सांघिक क्विझ स्पर्धेतील स्पर्धकांना रोख ११ हजारांची पारितोषिके व स्मृतिचिन्ह देण्यात येईल.
सांघिक क्विझ स्पर्धेत सहभाग नोंदवणाऱ्या संघास प्रवेश शुल्क रु. १०० तर वैयक्तिक लेखी परीक्षेत परीक्षेत सहभाग नोंदवणाऱ्या विद्यार्थ्यांना रु. ५० आहे. वैयक्तिक लेखी परीक्षा इंग्रजीतून आणि सांघिक स्पर्धा मराठी / इंग्रजीतून घेतली जाईल. स्पर्धेच्या नियम व अटींसह अन्य माहितीसाठी स्पर्धाप्रमुख प्रा. के. जी. जाधव यांच्याशी संपर्क साधावा.