
तात्यासाहेब कोरे फार्मसी महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा
03522
‘कोरे फार्मसी’त माजी विद्यार्थी मेळावा
वारणानगर : आमच्या यशस्वी वाटचालीत तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे मत माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रा. शोभराज माळवी यांनी येथे व्यक्त केले. कोरे फार्मसी महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळाव्यात ते बोलत होते. प्राचार्य डॉ. जॉन डिसोझा यांनी स्वागत करुन २००० हून अधिक पदवी आणि पदविकाप्राप्त विद्यार्थ्यांपैकी अनेक विद्यार्थी शासकीय सेवा, बहुराष्ट्रीय कंपन्या, शिक्षण क्षेत्रात महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. फार्म डी., बी. फार्मसी प्रॅक्टिस, सीवोटू एक्सट्रॅक्टर आणि सेल कल्चर लॅब अशा दोन नवीन प्रयोगशाळा असल्याचे सांगितले. प्राचार्य डॉ. सी. एम. जमखंडी, माजी विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष रोहन पाटील यांच्यासह माजी विद्यार्थी उपस्थित होते. मेळाव्यास वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे, प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. एम. व्ही. शिंदे यांनी आभार मानले.