आमदार कोरे ना विधानसभेत बिनविरोध पाठवा- नारायण राणे

आमदार कोरे ना विधानसभेत बिनविरोध पाठवा- नारायण राणे

03557


वारणा महाराष्ट्राचे विकासाचे केंद्र
नारायण राणे; वारणानगर येथे गुणवंताचा गौरव
वारणानगर, ता. २५ : ‘‘विनय कोरे यांनी वारणेत विविध उद्योगांची क्रांती केली आहे. वारणा हे महाराष्ट्राचे विकासाचे केंद्र बनले असून आमदार कोरे यांच्यासारख्या नेतृत्वाला जनतेने विधानसभेत बिनविरोध पाठवावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी येथे केले.
वारणा शिक्षण संकुलातील टेक्नीकल सेंटरला २० कोटी रूपयांची मदत जाहीर करून डॉ. कोरे यांनी मागणी केलेल्या सर्व योजना देणार असल्याचीही त्यांनी ग्वाही दिली.
येथील डॉ. विनय कोरे गौरव प्रतिष्ठान व श्री वारणा विभाग शिक्षण समूहातर्फे वारणा कार्यक्षेत्रातील शिक्षकांना शिक्षण भूषण पूरस्कार, गुणवंत विद्यार्थी गौरव व बार्शी (जि. सोलापूर) येथील डॉ. रणजीतसिंह डिसले यांना ‘डॉ. विनय कोरे शिक्षण भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी मंत्री राणे बोलत होते. अध्यक्षस्थानी वारणा समूहाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे होते.
मंत्री राणे पुढे म्हणाले, ‘‘माझे विनय कोरेशी गेल्या २५ वर्षापासून मैत्रीपूर्णनाते संबंध आहेत. त्यांची विकासासाठी असणारी धडपड मी स्वतः बघितली आहे. वारणा देशात आणखीन नावारूपास यावा यासाठी जी मदत लागेल ती मी देण्यास आहे.’’ वारणा शिक्षण संकुलात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘स्किल इंडिया उपक्रम’ राबवणाऱ्या विश्‍वविलास स्कूल ऑफ एक्सलन्सचे व विलासराव कोरे तारांगण सेंटरचे उद्‍घाटन मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते व आमदार कोरे, निलमताई राणे, शुभलक्ष्मी कोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
आमदार डॉ. विनय कोरे यांनी स्वागत केले ते म्हणाले, ‘‘शिक्षण क्षेत्रातील ग्रामीण आणि उद्योजकतेसाठी संवर्धनासाठी असणारी ॲसपायरयोजना वारणा शैक्षणिक संकुलात राबवावी.’’
डॉ. रणजितसिंह डिसले म्हणाले, ‘‘अमेरिकेत प्राथमिक स्तरापासून औद्योगिक शिक्षण दिले जाते. उद्योजक निर्माण होण्यासाठी शाळेत उद्योगाचे शिक्षण देण्याची गरज आहे.’’ प्रा. जीवनकुमार शिंदे यांनी मानपत्र वाचन केले. दरम्यान शोभाताई कोरे वारणा महिला पतसंस्थेच्या ‘वारणाई’ सुवर्ण ऋण योजनेचे प्रारंभ निलमताई राणे यांच्या हस्ते झाला. या वेळी तानाजी वाघमोडे, अक्षय संकपाळ यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम, ‘गोकुळ’चे संचालक अमरसिंह पाटील, वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रताप पाटील, सुशांत फडणीस, अजिंक्य पाटील, प्राचार्य डॉ. एस. व्ही. आणेकर, प्राचार्य जॉन डिसोझा, प्राचार्य प्रकाश चिकुर्डेकर, वारणा विविध उद्योग व शिक्षण समुहातील पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते. प्रा. सी. पी. शिंदे, प्रा. नामदेव चोपडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. नामदेव चोपडे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com