
सावित्री महिला औद्योगिक संस्थेत जागतिक महिला दिनानिमित्त जनजागृती शिबीर -
03570
सावित्री महिला औद्योगिक
संस्थेत जनजागृती शिबिर
वारणानगर, ता. ७ : महिलांनी निर्णयक्षमता दृढ करून आत्मविश्वासपूर्ण वाटचाल करावी. अडचणींचे निराकरण
कमी वेळेत करण्यासाठी मेडिएशनची भूमिका घ्यावी,’ असे प्रतिपादन पन्हाळयाच्या दिवाणी न्यायाधीश के. जे. खोमणे यांनी केले.
तात्यासाहेब कोरेनगर येथील सावित्री महिला औद्योगिक सहकारी संस्थेत तालुका विधी सेवा समिती व वकील संघटनेतर्फे कायदेविषयक जनजागृती शिबिरावेळी न्यायाधीश खोमणे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सावित्री महिला संस्थेच्या अध्यक्षा शुभलक्ष्मी कोरे होत्या.
शुभलक्ष्मी कोरे म्हणाल्या, ‘संस्थेत महिलांच्या भरीव योगदानामुळे उलाढालीसह नफाही वाढत आहे.’ वकील संघटना पन्हाळाचे उपाध्यक्ष ॲड. व्ही. ए. पाटील यांनी सायबर लॉ, सोशल मीडियाचा वाढता वापर, कुटुंब व्यवस्थापनात महिलांची भूमिकेबाबत माहिती दिली. ॲड. राजेंद्र पाटील यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी उपाध्यक्षा मुग्धा येडूरकर, संचालक, ए. जे. हावळ, ॲड. सचिन पाटील, ॲड. शिवाजी पाटील, ॲड. अभिजित बच्चे-पाटील, रंजना देशमुख, बहिरेवाडी सरपंच प्रमिला जाधव, उज्ज्वला जाधव, रमा काशीद, धनश्री जाधव, मनीषा संकपाळ, शारदा महाजन, वारणा दूध संघाचे अकौंट मॅनेजर सुधीर कामेरीकर, कर्मचारी उपस्थित होते. प्रा. शिल्पा पाटील यांनी स्वागत, शीतल बसरे यांनी सूत्रसंचालन तर चैत्राली सावंत यांनी आभार मानले.