शोभाताई कोरे स्त्री कर्तृत्व सन्मान पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शोभाताई कोरे स्त्री कर्तृत्व सन्मान पुरस्कार
शोभाताई कोरे स्त्री कर्तृत्व सन्मान पुरस्कार

शोभाताई कोरे स्त्री कर्तृत्व सन्मान पुरस्कार

sakal_logo
By

03572

शोभाताई कोरे स्त्रीकर्तृत्व सन्मान पुरस्कार वितरण
वारणानगर: येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयात श्रीमती शोभाताई कोरे स्त्री कर्तृत्व सन्मान २०२३ पुरस्कारांचे वितरण झाले. प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम, प्राचार्य डॉ. प्रकाश चिकर्डेकर उपस्थित होते. वारणा भगिनी मंडळाच्या उपाध्यक्षा स्नेहा कोरे, सावित्री महिला औद्योगिक संस्थेचे अध्यक्षा शुभलक्ष्मी कोरे, दिवाणी न्यायाधीश अमृता जाधव, मंत्रिमहोदयांच्या गाडीचे सारथ्य सर्वप्रथम करणाऱ्या तृप्ती मुळीक, आगीत अतुल्य कामगिरी केल्याबद्दल कोमल ढोले यांना ‘श्रीमती शोभाताई कोरे स्त्री कर्तृत्व सन्मान’ पुरस्कार देऊन गौरविले. नाजिया मुल्ला व चैत्राली पवार यांनी स्वागतगीत सादर केले. वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी शुभेच्छा दिल्या. प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. शुभलक्ष्मी कोरे, स्नेहा कोरे यांनी शोभाताई कोरेंच्या कार्याचा आढावा घेतला. डॉ. प्रीती शिंदे, डॉ. संतोष जांभळे, डॉ. एस. एस. खोत, दादा बच्चे ,भालचंद्र शेटे, कार्यालयीन प्रबंधक बाळासाहेब लाडगावकर यांनी संयोजन केले. प्रा. संध्या साळोखे यांनी पाहुण्यांचा परिचय दिला. प्रा. शिल्पा पाटील यांनी सूत्रसंचालन, प्रा. सीमा नलावडे यांनी आभार मानले.