
वारणा बझारची निवडणूक बिनविरोध आमदार डॉ. विनय कोरे यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध
03574
वारणा बझारची निवडणूक बिनविरोध
तीन नविन चेहऱ्यांना संधी
वारणानगर, ता.८: सहकारमहर्षि पुरस्कारप्राप्त वारणा बझार या सहकारी ग्राहक संस्थेची सन २०२२-२३ ते २०२७-२८ या कालावधीकरिता पंचवार्षिक निवडणूक वारणा विविध शिक्षण व उद्योग समूहाचे नेते व माजी मंत्री डॉ. विनय कोरे यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध पार पडली. संचालक मंडळाच्या १५ जागांसाठी बिनविरोध झालेल्या निवडीमध्ये तीन नविन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
येथील वारणा बझार ही संस्था १९७६ साली सहकारमहर्षि तात्यासाहेब कोरे यांनी स्थापन केली. कोल्हापूर व सांगली या दोन जिल्ह्यांची कार्यक्षेत्र असणाऱ्या वारणा बझारने आजपर्यंत दोन डिपार्टमेंट स्टोअर्स, ५० शाखा असा मोठा विस्तार केला आहे. गेल्या ४६ वर्षांत ग्राहक सेवेत कार्यरत असणाऱ्या वारणा बझारची १७० कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल आहे. संस्था स्थापनेपासूनच सातत्याने ऑडीट ''अ'' वर्ग मिळणाऱ्या बझारची निवडणूक बिनविरोध होण्याची आजपर्यंतची परंपरा आहे. यावेळेसही संस्थेने बिनविरोध निवडीची परंपरा यावेळी कायम राखली असल्याचे डॉ. विनय कोरे व सरव्यवस्थापक शरद महाजन यांनी सांगितले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक नारायण परजणे यांनी काम पाहिले.
...
बिनविरोध निवडून आलेले संचालक मंडळ असे-
शुभलक्ष्मी विनय कोरे (वारणानगर), सुभाष आप्पासाहेब देसाई (मिणचे), विजयसिंह गोविंदराव जाधव (बहिरेवाडी), अनिल नेमगोंडा पाटील (किणी), विश्वनाथ तात्यासाहेब पाटील (अंबप), शारदा बाबासाहेब मुळीक ( पाडळी), बबूताई राजाराम महापुरे (कोडोली), सजाक्का पांडुरंग सिद (जुने पारगांव), देवकीदेवी दिनकर पाटील (करंजवडे), सुवर्णादेवी लक्ष्मण पाटील (टोप), शोभा संभाजी पाटील (माले), मोहनराव शिवलिंग आजमने (कामेरी), राजाराम मनोहर गुरव (वशी), मनिषा वसंत पाटील (कार्वे), स्मिता राजेंद्र कापरे (कोडोली).
---------