
वारणा बझारच्या अध्यक्षपदी शुभलक्ष्मी कोरे यांची व उपाध्यक्षपदी सुभाष देसाई यांची बिनविरोध निवड
03582
...
वारणा बझारच्या अध्यक्षपदी
शुभलक्ष्मी कोरे बिनविरोध
वारणानगर, ता. १३ : देशातील सहकारी ग्राहक भांडार क्षेत्रात अग्रेसर ‘वारणा बझार’ सहकारी ग्राहक संस्थेच्या अध्यक्षपदी शुभलक्ष्मी विनय कोरे (वारणानगर) यांची तर उपाध्यक्षपदी सुभाष आप्पासो देसाई (सावर्डे मिणचे) यांची आज बिनविरोध निवड झाली. अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी नारायण परजणे होते.
वारणा बझार संस्थेची १५ जागांसाठी पंचवार्षिक निवडणूक आमदार डॉ. विनय कोरे यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध झाली. आज संचालक मंडळाच्या सभेत अध्यक्षपदी शुभलक्ष्मी कोरे यांची तर उपाध्यक्षपदी सुभाष देसाई यांची सर्वानुमते निवड झाली. यावेळी नूतन अध्यक्षा कोरे व उपाध्यक्ष देसाई व नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार झाला. संस्था स्थापनेपासून अ वर्ग व ४६ वर्षे ग्राहक सेवेत असणाऱ्या बझारने १७५ कोटी वार्षिक उलाढाल केली. बिनविरोध निवडणुकीबद्दल सभासदांचे आभार मानून बझार सर्वांचा विश्वास सार्थक ठरवेल, अशी ग्वाही अध्यक्षा शुभलक्ष्मी कोरे व उपाध्यक्ष सुभाष देसाई यांनी दिली.
प्रारंभी बझारचे सरव्यवस्थापक शरद महाजन यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी संचालक विजयसिंह जाधव, विश्वनाथ पाटील, अनिल पाटील, मोहनराव आजमने, राजाराम गुरव, शारदा मुळीक, बबुताई महापुरे, सजाक्का सिद, देवकीदेवी पाटील, सुवर्णादेवी पाटील, शोभा पाटील, मनीषा पाटील, स्मिता कापरे व अधिकारी उपस्थित होते.