बहिरेवाडी येथे तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसीचे  (डिप्लोमा ) राष्ट्रीय सेवा योजना शिबीर संपन्न

बहिरेवाडी येथे तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसीचे (डिप्लोमा ) राष्ट्रीय सेवा योजना शिबीर संपन्न

03594

बहिरेवाडीत कोरे फार्मसीचे
राष्ट्रीय सेवा योजना शिबिर
वारणानगर, ता. २० : वारणा विभाग शिक्षण मंडळ संचालित तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसी (डिप्लोमा) यांच्यावतीने बहिरेवाडीत (ता. पन्हाळा) राष्ट्रीय सेवा योजना शिबिर झाले.
शिबिराचे उद्घाटन सरपंच श्रीमती प्रमिला जाधव यांच्या हस्ते, पन्हाळा पंचायत समितीचे माजी सभापती रवींद्र जाधव, उपसरपंच युवराज भोसले, सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थितीत झाले. शिबिराची सुरुवात प्रभात फेरीने झाली. शिबिरात रक्तदाब तपासणी, धनुर्वात लसीकरण, ऑक्सिजन पातळी तपासणी झाली. ग्रामस्थांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप झाले. विद्यार्थ्यांनी घरोघरी भेट देऊन ‘औषधे हाताळताना घ्यावयाची काळजी’ याबद्दल जनजागृती केली. शिबिरात डॉ. उज्ज्वला चौगुले यांचे ‘आरोग्यम धनसंपदा’ विषयावर व्याख्यान झाले. शिबिराचा समारोप वृक्षारोपणाने झाला. शिबिर यशस्वीतेसाठी वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे, प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम, प्राचार्य डॉ. सी. एम. जमखंडी यांचे मार्गदर्शन लाभले.
एन. एस. एस. समन्वयक रवींद्र पाटील, प्रा. डॉ. संगण्णा बुर्ली, प्रा. एस्थेर गायकवाड, प्रा. पूजा कोतमिरे, प्रा. आरती खोत, विकास पाटील, कृष्णात पायमल, संताजी पाटील, पंडित नलवडे, अशोक कुंभार, प्रवीण भोसले व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. प्रा. वृंदा जाधव यांनी सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com