
गेट परीक्षेत कोरे अभियांत्रीकीच्या ५ विद्यार्थ्याचे यश
03596
प्रतीक पाटील, विकास शिरास्डेकर, ओमकार शिंत्रे, भावेश कोराणे, प्रमोद भोसले
कोरे अभियांत्रिकीच्या
पाच विद्यार्थ्यांचे यश
-------
वारणानगर, ता. २३ : गेट २०२३ मध्ये झालेल्या गेट परीक्षेत तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ५ विद्यार्थ्यांनी यश मिळविले. पात्र विद्यार्थ्याना उच्च शिक्षणासोबत शासकीय, निमशासकीय आणि उद्योग क्षेत्रातील संधी मिळतील, असे प्राचार्य डॉ. एस. व्ही. आणेकर यांनी सांगितले. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रा. लिंगराजू यांचे मार्गदर्शन लाभले.
पात्र विद्यार्थी गुण कंसात: केमिकल इंजिनिअरिंग: प्रतीक विनय पाटील (३७.६७), विकास शशिकांत शिरास्डेकर (३२.६७),सिविल इंजिनिअरिंग : ओमकार राजेंद्र शिंत्रे (२६), कॉम्युटर सायन्स इंजिनिरिंग : भावेश अशोक कोराणे (३५.६७), प्रमोद विजयकुमार भोसले (३६.३३).
कोरे अभियांत्रीकीत प्रथम वर्षापासूनच स्पर्धा परीक्षा, गेट, जीआरईविषयी मार्गदर्शनासाठी विशेष प्रशिक्षण होते. परीक्षेनंतर संधीबद्दल माहिती दिली जाते. तिसऱ्या व शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी एसीई अकॅडमी, हैदराबाद, व गेट फोरम, कोल्हापूरमधील तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन होते. गेट परीक्षेसाठी गेट ट्युटर सॉफ्टवेअर असल्याने विद्यार्थी ऑनलाईन तयारी करू शकतात.सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे वारणा विविध उद्योग व शिक्षण समुहाचे प्रमुख डॉ. विनय कोरे व प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम, प्राचार्य डॉ. एस. व्ही. आणेकर यांनी अभिनंदन केले.विद्यार्थ्यांना प्रा. के. आय. पाटील, प्रा. सी. पी. शिंदे, डॉ. डी. एम. पाटील, प्रा.आर. बी. पाटील, डॉ. पी. व्ही. मुळीक व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.