
वारणा महाविद्यालयात पारीतोषिक वितरण
03598
वारणा महाविद्यालयात पारितोषिक वितरण
वारणानगर, ता. २३ : येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाचे वार्षिक पारितोषिक झाले. क्रीडा, राष्ट्रीय छात्रसेना, राष्ट्रीय सेवा योजना, गुणवत्तेत प्रत्येक वर्गातून पहिल्या तीन क्रमांक मिळविलेल्यांना दीड लाखाहून अधिक रकमेची पारितोषिके, रोख रक्कम व भेटवस्तू प्रदान करण्यात आली. वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी खेळाडू आणि प्राध्यापक, विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्रमुख पाहुणे शिवाजी विद्यापीठाचे क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक प्रा. डॉ. शरद बनसोडे, दूध संघाचे संचालक डॉ. मिलिंद हिरवे, प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम यांची उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर होते.
क्रीडासंचालक आण्णासो पाटील यांनी, विद्यार्थ्यांच्या कामगिरीचा आढावा घेऊन अहवालवाचन केले. यावेळी २०० हून अधिक विद्यार्थ्यांना भेटवस्तू, एक हजार रुपये देऊन सन्मानित केले. १८ प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांचाही सत्कार केला. डॉ. बनसोडे म्हणाले, ‘वारणाने क्रीडा, शिक्षण, उद्योग, समाजकारण, अर्थकारण, सहकार आणि राजकारणाला दिशा दिली.’ डॉ. हिरवे, प्रा. डॉ. रासम, प्राचार्य डॉ. चिकुर्डेकर यांची भाषणे झाली. प्राचार्य एस. एन. शेख, वैभव बुड्ढे, प्रा. नितीन कळंत्रे, प्रा. एस. के. आतीरकर, प्रा. डी.ए. खोत, प्रबंधक बाळासाहेब लाडगावकर उपस्थित होते. प्रा. संध्या साळुंखे, प्रा. सीमा काटकर यांनी सूत्रसंचालन, प्रा. क्रांतीकुमार पाटील यांनी आभार मानले.