
मुलीनो यशस्वी उद्योजक बना: अंजोरी परांडेकर कोरे अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालयात महिला उद्योजकता – डेअर टू स्टँड आऊट विषयावर परिसंवाद’
03602
मुलींनो यशस्वी
उद्योजक बना
अंजोरी परांडेकर; कोरे अभियांत्रिकीत परिसंवाद
वारणानगर, ता. ३० : मुलींनी नोकरीपेक्षाही स्वतःचा व्यवसाय सुरू करावा व यशस्वी उद्योजक बनावे, असे आवाहन सीआयआरईईच्या सहसंस्थापिका अंजोरी परांडेकर यांनी येथे केले.
तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयातील महिला सशक्तीकरण सेल आणि अंतर्गत अनुपालन समितीतर्फे विद्यार्थिनी, प्राध्यापिकांसाठी ‘महिला उद्योजकता – डेअर टू स्टँड आऊट” विषयावरील परिसंवादात त्या बोलत होत्या.
अंजोरी यांनी स्टार्ट अप बिझनेसचे महत्त्व आणि व्यवसाय सुरू करण्याबाबत चर्चा केली. नोकरी, व्यवसायाबाबत अनुभव सांगितले. विविध सरकारी संस्थांकडून आवश्यक कायदेशीर परवानग्या घेऊन स्टार्ट अपच्या नियोजन आणि अंमलबजावणी कशी करावी याची चर्चा केली. स्टार्ट अपच्या विविध टप्प्यांवर निधी उभारण्यासाठी बँक किंवा वित्तीय संस्थांकडे प्रस्ताव कसे सादर करावेत याचेही मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना प्रवृत्त करण्यासाठी विविध युनिकॉर्न ऑफ इंडियन स्टार्ट ॲपबद्दल चर्चा केली.
वारणा विविध उद्योग व शिक्षणसमूहाचे अध्यक्ष, डॉ. विनय कोरे व प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम, प्राचार्य डॉ. एस. व्ही. आणेकर यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी डॉ. व्ही.डी. पाटील, डॉ. एस. बी. पाटील, प्राध्यापिका व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. जान्हवी माने यांनी प्रास्ताविक केले.