Mon, Sept 25, 2023

शोभाताई कोरे महिला पतसंस्थेच्या अध्यक्षपदी शुभलक्ष्मी कोरे, उपाध्यक्षपदी राजश्री कळत्रे याची बिनविरोध निवड
शोभाताई कोरे महिला पतसंस्थेच्या अध्यक्षपदी शुभलक्ष्मी कोरे, उपाध्यक्षपदी राजश्री कळत्रे याची बिनविरोध निवड
Published on : 5 May 2023, 7:23 am
03670
शुभलक्ष्मी कोरे, राजश्री कळत्रे
शुभलक्ष्मी कोरे, राजश्री कळत्रे यांची निवड
वारणानगर : येथील शोभाताई कोरे वारणा माहिला सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी शुभलक्ष्मी विनय कोरे यांची तर उपाध्यक्षपदी राजश्री बाळासाहेब कळंत्रे यांची बिनविरोध निवड झाली. संस्थेची २०२२-२३ ते २०२७-२८ साठी पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी नारायण परजणे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाच्या विशेष सभेत ही निवड झाली. यावेळी तज्ञ संचालकपदी सुधीर कामेरकर, शशिकला चव्हाण आणि यांची निवडही झाली. निवडीसाठी आमदार डॉ. विनय कोरे, सल्लागार सदस्य आर. टी. पाटील, संचालक, एस. वाय. पाटील, अधिकारी कृष्णात आ. माने व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.