
पन्हाळ्यातील नाभिकांचा लवकरच मेळावा
03678
पन्हाळ्यात नाभिकांचा लवकरच मेळावा
वारणानगर : पन्हाळा नाभिक समाजाचा मेळावा लवकरच घेऊन समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आमदार डॉ. विनय कोरे यांनी दिली. पन्हाळा तालुका नाभिक संधाची नूतन कार्यकारणीची पहिली विशेष सभा झाली. यावेळी पन्हाळा तालुका नाभिक समाजाचे नूतन अध्यक्ष संजय अंबाजी रोकडे, माहिला तालुका कार्याध्यक्ष स्नेहल आनंदा रोकडे यांचा सत्कार डॉ. कोरे यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष भीमराव शिंदे, जिल्हा सरचिटणीस सरदार झेंडे, संपर्कप्रमुख विजय संकपाळ, प्रसिद्धीप्रमुख दगडू काशीद, कार्याध्यक्ष विवेक रोकडे, उपाध्यक्ष दत्ता काशीद, परशुराम खुडे, आप्पासाहेब रोकडे, मोहन काशीद, राजू मेथे, महिला उपाध्यक्ष गौरी रोकडे, शर्वरी काशीद, सचिव सतीश झेंडे यांच्यासह सर्व नूतन कार्यकारिणी उपस्थित होती.