
राधानगरीकरांच्या भावना चिंब
01553
01558
01554
राजर्षी शाहूंच्या स्मृतींनी ग्रामस्थ चिंब...
जलकुंभ कोल्हापूरला रवाना; धरणापासून बस स्थानकापर्यंत शोभायात्रा
राधानगरी, ता. ३० : राजर्षी शाहू महाराजांनी कार्यकाळातील निम्मी हयात फेजिवडेच्या माळावर धरण उभारण्यात घालवली. संस्थानातील माझ्या रयतेचा दुष्काळ कायमचा जावा म्हणून रात्रीचा दिवस केला. ते स्वप्न अर्ध्यावर ठेवून महाराज सोडून गेले. यंदा त्याला शंभर वर्ष होत आहेत. त्या उपकारात आजही राधानगरीकर आहेत. म्हणूनच आज धरणातील जलकुंभ मिरवणुकीने शाहू महाराजांच्या चरणी रवाना केला. शेकडो नागरिकांच्या भावना आज महाराजांच्या स्मृतींनी चिंब झाल्या होत्या.
राजर्षी शाहू महाराज कृतज्ञता पर्वाच्या निमित्ताने आज स्थानिक समितीने विशेष कार्यक्रम घेऊन जलकुंभ अर्पण केला. सकाळी राधानगरी धरण स्थळावर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते जलकुंभाचे पूजन झाले. त्यानंतर जलकुंभ आमदार प्रकाश आबिटकर यांनी स्थानिक समितीकडे सुपूर्द केला. धरण स्थळापासून बस स्थानकापर्यंत जलकुंभाची शोभायात्रा काढली.
कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे, किसन चौगले, तालुका काँग्रेस अध्यक्ष हिंदूराव चौगुले, शिवसेना तालुकाप्रमुख उत्तम पाटील, भिकाजी हळदकर, भाजप तालुकाध्यक्ष संभाजी आरडे, ऋतुराज इंगळे, जिल्हा परिषद सदस्य विनय पाटील, रवीश पाटील, राधानगरीच्या सरपंच कविता शेट्टी, मोहन पाटील, अभिषेक डोंगळे, सुशील पाटील, फेजिवडे सरपंच फारूक नावळेकर, महादेव कोथळकर, तहसीलदार मीना निंबाळकर, गटविकास अधिकारी संदीप भंडारी, वनक्षेत्रपाल सुहास पाटील, रमेश पाटील, सुहास निंबाळकर, महेश तिरवडे, दीपक शेट्टी, बशीर राऊत, सतीश फणसे, अनिल बडदारे, महेश निल्ले, पी एस पाटील, पप्पू पालकर, यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते शाहूप्रेमी उपस्थित होते.
फेजिवडेत स्वागत
फेजिवडे येथे मुस्लिम समाजाच्या वतीने जलकुंभाचे जल्लोषी स्वागत करून सर्वांना सरबत वाटप केले. हलगी व लेझीम च्या ठेक्यात राधानगरी धरण स्थळापासून बसस्थानकापर्यंत भव्य शोभायात्रा काढली. शाहू महाराज की जय हा जयघोष होता. पावला पावलाला त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त होत होती.
भोगावतीवर पूजन
राशिवडे बुद्रुक ः राधानगरी धरणातून आणलेल्या जलकुंभाचे भोगावती सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील कौलवकर यांच्या हस्ते पूजन झाले. संचालक विश्वनाथ पाटील, हिंदूराव चौगले, बी. आर. पाटील, ए. डी. चौगले, प्रा. शिवाजीराव पाटील, कार्यकारी संचालक संजय पाटील, मोहन पाटील, रमेश बचाटे, अनिल बडदारे, संभाजी आरडे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सर्जेराव पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Yel22b04427 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..