लोकार्पन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोकार्पन
लोकार्पन

लोकार्पन

sakal_logo
By

शाहू स्मृती केंद्राचे
लोकार्पण भव्यदिव्य करू
अभिजित तायशेटे; रविवारी आदित्य ठाकरेंची उपस्थिती
राधानगरी, ता. ७ : राजर्षी शाहू स्मृतिशताब्दी वर्षातच राधानगरी धरण स्थळावरील शाहू स्मृती केंद्राचा लोकार्पण सोहळा या कृतज्ञता पर्वातील महत्त्वपूर्ण घटना आहे. केंद्राचा लोकार्पण सोहळा पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते रविवारी (ता. १५) दुपारी चार वाजता होणार आहे. हा सोहळा भव्यदिव्य करण्याचा निर्धार येथे झालेल्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या बैठकीत करण्यात आला. लोकार्पण सोहळ्याच्या नियोजन पार्श्वभूमीवर राजर्षी शाहू महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष आणि गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे यांनी बैठकीचे आयोजन केले होते.
बैठकीत लोकार्पण सोहळ्यादिवशी शोभायात्रा, चित्ररथ, शाहूकालीन दस्तावेजांचे प्रदर्शन आदी उपक्रम आखण्याच्या सूचना कार्यकर्त्यांनी केल्या. पंचक्रोशीतील ग्रामपंचायती, सहकारी संस्था, तरुण मंडळे, संघटनांनी नियोजनात सक्रिय सहभागाचे आवाहन श्री. तायशेटे यांनी केले.
बैठकीला सरपंच कविता शेट्टी, पिरळचे सरपंच मारुती चौगुले, बशीर राऊत, हसन राऊत, तानाजी चौगले, डी. जी. चौगले, चंद्रकांत चौगले, दादा सांगावकर, अनिल बडदारे, सतीश फणसे, राजाराम निउंगरे, बापू घोलकर, वसंतराव केरकर, संतोष तायशेटे, भाऊ टेपुगडे, शरद पाडळकर, नारायण आयरे, सम्राट केरकर यांच्यासह बनाचीवाडी, पिरळ, कुडुत्री, सोन्याची शिरोली आदी गावांतील कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Web Title: Todays Latest Marathi News Yel22b04444 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top