
दाजीपूर रिसॉर्ट
राधानगरी ''हॉलिडे रिसॉर्ट'' अपूर्णच
आमदार आबिटकरांचा रेटा : मंजुरी होताच काम सुरू
राधानगरी, ता. २१ : सुधारित आराखडा आणि अंदाजपत्रक प्रस्ताव मंजुरीची कार्यवाही लांबल्याने, दाजीपूरातील ''हॉलिडे रिसॉर्ट''चे काम तूर्तास पुढे सरकण्याची शक्यता अंधुक झाली आहे. रिसॉर्टच्या बाकी कामाचा सुधारित प्रस्ताव तीन महिन्यांपासून चर्चेत आहे. आमदार प्रकाश आबिटकर यांनी खुद्द पर्यटन विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांची भेट घेतली. तब्बल चार वर्षांपासून अपूर्णावस्थेत राहिलेल्या कामाची वस्तुस्थिती मांडली. महामंडळाच्या कार्यकारी अभियंत्यांनी रिसॉर्ट कामाच्या प्रस्तावाचे सादरीकरण केले.
शिल्लक राहिलेल्या कामांचा आराखडा, अपेक्षित खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले. या सुधारित आराखडा/अंदाजपत्रकाला तत्काळ मंजुरी आणि आर्थिक निधी देण्याची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ठोस आश्वासन दिले. प्रत्यक्षात कार्यवाहीला चालढकलच सुरू राहिली आहे. सुधारित आराखडा अंदाजपत्रक प्रस्तावाला मंजुरी कार्यवाही वेळीच झाली असती तर, पावसाळ्यापूर्वी कामे सुरू करून, ते तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजनही यंत्रणेने आखले होते. प्रस्ताव मंजुरीतच अडकून राहिल्याने नियोजन कागदावरच राहिले. आता रिसॉर्ट योजना पूर्णत्वाची आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
‘‘आधी तांत्रिक बाबी आणि सुधारित अंदाजपत्रक आराखड्याच्या कारणाने ठेकेदाराने अंतिम टप्प्यातील चार वर्षांपासून काम बंदच ठेवले. आता आमदार आबिटकरांच्या प्रयत्नातून गुंता सुटला. तरी बाकी काम सुरू होण्यास प्रशासकीय खोडा पडला आहे.’’
कोट
‘‘सुधारित आराखडा अंदाजपत्रक प्रस्तावाला पुढील आठवड्यात अंतिम मंजुरी निश्चितपणे मिळेल. सीईओंकडे बाकी कामाच्या प्रस्तावाचे सादरीकरण झाले आहे. अंतर्गत कामे बाकी असल्याने शक्यतो पावसाळ्यातही काम सुरू करण्यास अडचण नाही. मंजुरी कार्यवाही होताच त्या दृष्टीने निर्णय घेऊ.’’
विजय बावधने,
कार्यकारी अभियंता,
पर्यटन विकास महामंडळ
।।।।।।।।।।।।।।।
Web Title: Todays Latest Marathi News Yel22b04470 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..