
टुडे ३
03001
राधानगरी : विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर जनता दलाच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
प्रोत्साहन अनुदानातील
जाचक अटी रद्द करा
-------
जनता दलातर्फे राधानगरी तहसीलसमोर निदर्शने
राधानगरी, ता. २७ : प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदानातील जाचक अटी रद्द करा. अतिक्रमित सरकारी जमिनी कसनाऱ्यांच्या नावे करा. ओलवण पैकी भटवाडी येथील वैयक्तिक मालकीच्या अभयारण्यासाठी घेतलेल्या जमिनीचे मूल्यांकन करा. या प्रमुख मगणींसह इतर मागण्यांसाठी जनता दलातर्फे राज्य महासचिव शिवाजी परुळेकर व जिल्हा उपाध्यक्ष वसंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली येथील तहसील कार्यालयासमोर निदर्शने केली. याचे निवेदन यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे, शासनाने शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून ५० हजार देण्याची घोषणा केली; परंतु अनुदान द्यायची वेळ आली तेव्हा अनेक अटी लावून शेतकऱ्यांना कमीत कमी रक्कम दिली जाईल, शासनाने यातील जाचक अटी रद्द कराव्यात. मौजे कासारवाडा (ता. राधानगरी) येथील गट नं. २९४ मधील तीस ते पस्तीस एकर जमीन धनगर समाज पिढ्यान्पिढ्या वापरत आहे. ही जमीन सरकारी जमीन आहे हे त्यांनाही माहीत नाही. वनविभागाकडून ही जमीन ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. ही जमीन शासनाच्या सुधारित कायद्यानुसार कसनाऱ्यांच्या नावे करावीत. न्यू करंजे येथील गट नं २ मधील जमिनींचे व झाडांचे मूल्यांकन वन्यजीव विभागाने तत्काळ करावे. हमीद इमाम कलोट यांच्या ओलवण पैकी भटवाडी येथील वैयक्तिक मालकीच्या अभयारण्यासाठी घेतलेल्या जमिनीचे मूल्यांकन करा. अभयारण्य लगतच्या वाकीघोल परिसरातील अडसुळवाडी, गावठाण येथील स्वेच्छा पुनर्वसन करावे, यावेळी तालुका कार्याध्यक्ष बी. एच. पाटील, तालुकाध्यक्ष विठ्ठल मुसळे, युवा जिल्हाध्यक्ष शरद पाडळकर, इकबाल कलोट, शौकत कलोट आदी उपस्थित होते.
भाजपतर्फे गारगोटीत
१ जुलैला रास्ता रोको
गारगोटी : प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यासाठी शासनाने काढलेल्या परिपत्रकात जाचक अटी घातल्या आहेत. या अटी रद्द करून नियमित कर्ज फेड करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांना ५० हजारांचे सानुग्रह अनुदान द्यावे, या मागणीसाठी भाजपतर्फे १ जुलैला कृषी दिनी रास्ता रोको आंदोलन करणार असल्याची माहिती नाथाजी पाटील व अलकेश कांदळकर यांनी दिली. महाविकास आघाडी सरकारने सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करण्याच्यादृष्टिने २ लाख रुपयांची थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी व नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५o हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाईल अशी घोषणा केली. मात्र अद्याप अनुदान दिले नव्हते. याबाबत शासनाने काढलेल्या परिपत्रक जाचक अटी घातल्या आहेत. प्रामाणिक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानापासून वंचित ठेवणाऱ्या महाभकास आघाडी सरकारविरोधात १ जुलैला ''महाराष्ट्र कृषी दिनी'' बसस्थानकासमोर रास्ता रोको करणार असल्याचे निवेदन तहसीलदार, पोलीस निरीक्षक, सहायक निबंधक यांना दिले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Yel22b04533 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..