
भोगावती बिले
‘भोगावती’तर्फे प्रतिटन
२७ रुपये खात्यावर वर्ग
राशिवडे बुद्रुक, ता. २९ : भोगावती सहकारी साखर कारखान्याने वाढीव एफआरपीनुसार प्रतिटन २७ रुपयांप्रमाणे बिले शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केल्याची माहिती अध्यक्ष आमदार पी. एन. पाटील (सडोलीकर) व उपाध्यक्ष उदयसिंह पाटील-कौलकर यांनी दिली.
गत हंगामात ५ लाख २० हजार ७२२ टन उसाचे गाळप केले होते. संपूर्ण उसाची बिले एफआरपीनुसार प्रतिटन ३००३ रुपयांप्रमाणे अदा केलेली आहेत. शासनाच्या सुधारित परिपत्रकानुसार साखर उतारा व तोडणी खर्च यांचा विचार करून एफआरपीमध्ये प्रतिटन २७ रुपये वाढ झाली आहे. त्यामुळे उर्वरित प्रतिटन २७ रुपयांप्रमाणे १ कोटी ४३ लाख ९ हजार रुपये उत्पादकांच्या खात्यावर आज वर्ग केले. आगामी हंगामात सहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून कारखान्याला ऊस पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन अध्यक्ष आमदार पाटील, उपाध्यक्ष पाटील यांनी केले. संचालक, प्रभारी कार्यकारी संचालक संजय पाटील व अधिकारी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Yel22b04536 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..