धबधबा सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धबधबा सुरू
धबधबा सुरू

धबधबा सुरू

sakal_logo
By

03013
राऊतवाडी : धबधब्याचे उग्र स्वरूप.

राऊतवाडी धबधबास्थळी उपाययोजना करण्याची गरज
पूर्ण क्षमतेने प्रवाहित होण्यापूर्वीच नियोजन हवे; पर्यटक वाढण्याची चिन्हे

राजू पाटील ः सकाळ वृत्तसेवा
येळवडे, ता. ५: राऊतवाडी धबधबा प्रवाहित झाल्याने आता पर्यटकांना पर्यटनाचे वेध लागले आहेत. पर्यटकांचा ओघ हळूहळू वाढत आहे. कोरोनामुळे तब्बल दोन वर्ष धबधबास्थळी पर्यटकांना प्रवेश बंदी राहिली. खंडित झालेल्या वर्षा पर्यटनावरील निर्बंध यंदाच्या पावसाळ्यात दूर झाले आहेत. यामुळे यंदा वर्षा पर्यटनाच्या निमित्ताने पर्यटक संख्येत लक्षणीय वाढीची चिन्हे आहेत. पर्यटक गर्दीचे नियंत्रणासाठी पोलिस यंत्रणा व स्थानिक समितीला धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित होण्यापूर्वीच नियोजन आखावे लागणार आहे.
अभयारण्य क्षेत्रातील या धबधबा क्षेत्राच्या सुधारणेनंतर ते सुरक्षित वर्षा पर्यटनस्थळ बनले आहे. मात्र वाहतूक कोंडी, हुल्लडबाज पर्यटक या समस्या कायम आहेत. धबधबास्थळी रविवारी आणि सुटीच्या दिवशी पर्यटकांची प्रचंड गर्दी होते. गर्दीवर नियंत्रण करणे पोलिस यंत्रणेलाही जिकीरीचे ठरते. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी यापूर्वी दुपारनंतर धबधबा स्थळावर पडळीतील प्रवेश कर नाक्यापासून वाहनांना प्रवेश बंदी करण्याची उपाययोजना आखण्यात आली. तशीच उपाययोजना यंदाही करण्याची गरज आहे.

चौकट
चेंजिंग रूमची उभारणी कागदावरच
धबधबा स्थळावर पर्यटकांसाठी चेंजिंग रूम उभारणीचे काम अद्याप बाकी राहिले आहे. चेंजिंग रूम सुविधाअभावी विशेषता महिला पर्यटकांची गैरसोय होणार आहे. धबधबा क्षेत्र विकास आराखड्यात दोन चेंजिंग रूम उभारणी कामाचा समावेश होता. त्यासाठी पाच वर्षांपूर्वी धबधबा क्षेत्राच्या पूर्व-पश्‍चिम दिशेला निश्चित केलेल्या स्थळावर महिला व पुरुष पर्यटकांसाठी स्वतंत्र चेंजिंग रूम उभारणीसाठी सिमेंटचे चौथरेही उभारण्यात आले आहेत. प्रत्यक्षात चेंजिंग रूम उभारणे कागदावरच राहिली आहे.


कोट
या धबधब्यावरील सुरक्षतेच्या कारणास्तव सायंकाळी सहानंतर कुणालाही प्रवेश मिळणार नाही. याशिवाय येणाऱ्या वाहनांची पार्किंगची व्यवस्था करण्यासोबतच हुल्लडबाजीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.
-आप्पासाहेब कोळी, पोलिस निरीक्षक, राधानगरी

Web Title: Todays Latest Marathi News Yel22b04537 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..