अभयारण्य ग्रामसभा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अभयारण्य ग्रामसभा
अभयारण्य ग्रामसभा

अभयारण्य ग्रामसभा

sakal_logo
By

वन्यजीव अधिवासनिर्मितीला विरोध
राधानगरीत ग्रामसभा; वन्यजीव विभागाकडे ठराव केला सादर
राधानगरी, ता. २७ ः राधानगरी अतिसंवेदनशील वन्यजीव अधिवासनिर्मिती प्रस्तावाला राधानगरी ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेत तीव्र विरोध दर्शविला. प्रस्तावित अतिसंवेदनशील वन्यजीव अधिवास घोषित करण्याची कार्यवाही रद्दबादल करण्याची मागणी केली. तसा ठराव वन्यजीव विभागाकडे सादर केला. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच कविता शेट्टी होत्या. संवेदनशील वन्यजीव अधिवास निर्मितीबाबत संरक्षित वनक्षेत्रातील ग्रामपंचायतीमध्ये बैठका घेऊन माहिती देण्यासाठी वन्यजीव विभागाच्या सूचनेनुसार ही ग्रामसभा झाली. ग्रामसभेत कार्यकर्त्यांनी धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास निर्मितीविरोधात आक्रमक भूमिका मांडली.
विस्तारित राधानगरी वन्यजीव अभयारण्याच्या मूळ अधिसूचनेविरोधातच उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. आता धोकाग्रस्त अधिवास निर्मितीला २८ गावांचाही विरोध कायम आहे, असे कृती समिती सचिव प्रा. पी. एस. पाटील यांनी सभेत स्पष्ट केले. धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास निर्मिती या गावांच्या विकासाच्या मुळावर उठणारी असल्याचे मतही सभेत व्यक्त झाले.
पर्यावरण अभ्यासक सुहास वांयगणकर व अनिल बडदारे यांनी धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास प्रस्तावाबाबत गैरसमज दूर करण्याच्या दृष्टीने सभेत निवेदन केले. उच्च न्यायालयाने धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित करण्याची निर्देश शासनाला दिले आहेत. त्या अनुषंगाने शासनाकडून कार्यवाही सुरू आहे. वन्यजीव अधिवास अभयारण्याच्या केवळ वनक्षेत्रावरच घोषित होणार आहे. त्याच्या खासगी व इतर सरकारी क्षेत्रावर काही परिणाम होणार नाही. अशी टिप्पणी सहायक वनसंरक्षक सुहास पाटील यांनी सभेपुढे सादर केली.
सभेला उपसरपंच भारती कुंभार, सुहास निंबाळकर, विक्रम पालकर, प्रा. चंद्रशेखर कांबळे, दीपक शेट्टी, नारायण आयरे, रमेश बचाटे, मारुती टिपुगडे, सतीश फणसे, मिथुन पारकर, संतोष तायशेटे, राकेश केलकर, बाळासाहेब कळमकर, सचिन पालकर आदीसह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

जनआंदोलनाचे संकेत
दरम्यान बनाचीवाडी, फेजिवडे, हसणे, ओलवण, न्यू करंजे या ग्रामपंचायतीच्या ग्रामसभातही प्रस्तावित धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास निर्मितीला विरोधाचे ठराव झाले. एकूणच धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास कार्यवाही वादग्रस्त आणि कळीचा मुद्दा ठरली आहे. यातून आगामी काळात जनआंदोलन उभे राहण्याचे संकेतच या ग्रामसभांतून मिळत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Yel22b04600 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top