काळम्मावाडी बाबत अनिश्चितता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काळम्मावाडी बाबत अनिश्चितता
काळम्मावाडी बाबत अनिश्चितता

काळम्मावाडी बाबत अनिश्चितता

sakal_logo
By

1752

‘काळम्मावाडी’त साठ्याबाबत संभ्रम कायम
प्रस्तावित ग्राऊंटिंगचे काम; नियंत्रित साठ्यामुळे पुढील वर्षी काम शक्य
राधानगरी, ता. १६ : काळम्मावाडी धरणात यंदा सांडवा पातळीपर्यंत (२१ टीएमसी) की पूर्ण संचयक्षमतेने (२५.४० टीएमसी )साठा करण्यात येणार याची अद्याप स्पष्टता झालेली नाही. जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी एप्रिल २०२२ मध्ये गळती रोखण्यासाठीच्या ग्राऊटिंगच्या पार्श्वभूमीवर यंदा धरणात सांडवा पातळीपर्यंतच साठा करण्याचे नियोजन असल्याची माहिती दिली होती. नियोजनानुसार धरणात पाच टीएमसी साठा कमी ठेवण्यात येणार आहे. जेणेकरून पुढील वर्षातील मे महिन्यात धरणातील पातळी ६११ मीटर पर्यंत राहून ग्राऊंटिंग काम करणे शक्य होईल. यादृष्टीने नियोजन केले आहे. यंदा पावसाळ्यापूर्वी धरणातील साठ्यात अपेक्षित घट झाली नाही. परिणामी मे महिन्यात प्रस्तावित ग्राऊटिंगचे काम लांबणीवर गेले. पुन्हा पुढील वर्षात मे महिन्यात अशी स्थिती राहू नये. यास्तव धरणातील साठा कमी ठेवण्याचे नियोजन आहे. मात्र धरण सांडवा पातळीपर्यंत भरले तरी धरणात सांडवा पातळीपर्यंत की पूर्ण संचयक्षमतेने साठा करावयाचा याची सूचना धरण व्यवस्थापनाला मिळालेली नाही. साठ्याबाबतची संभ्रमावस्था दूर झालेली नाही. दरम्यान धरणात पाच टीएमसीने साठा कमी ठेवण्याची नियोजन आहे.
धरणात दरवर्षी पावसाळ्यापूर्वी जवळपास पाच ते सहा टीएमसी साठा शिल्लक राहतो. त्यात मे महिन्यापर्यंत अपेक्षित घट होत नाही.

तरच पुढील वर्षी काम
पाणी पातळी ६११ मीटरपर्यंत घटत नसल्याने ग्राउटिंग कामात अडसर येतो. पाच वर्षात लाभक्षेत्रात होणारा पाणी वापर आणि शिल्लक साठा याच्या अभ्यासातून यंदाच्या पावसाळ्यातील धरण साठ्याचे नियोजन निश्चित केले आहे. पाणीसाठा कमी ठेवण्याच्या नियोजनातूनच पुढील पावसाळ्यापूर्वी ग्राऊटींगचे काम करणे शक्य होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Yel22b04620 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..