पाच दरवाजे खुले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाच दरवाजे खुले
पाच दरवाजे खुले

पाच दरवाजे खुले

sakal_logo
By

१७६४
स्वयंचलित दरवाजे चालू बंदचा सिलसिला
राधानगरी धरण परिसरात अतिवृष्टी; आवक पाण्यावर नियंत्रणासाठी काळम्मावाडीचे दरवाजे उचलले
सकाळ वृत्तसेवा
राधानगरी, ता. ११ : तालुक्यात पुन्हा पावसाने जोर धरल्याने धरणांची पातळी झपाट्याने वाढली असून, राधानगरी धरणाच्या स्वयंचलित पाच दरवाजातून विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरू आहे. यामुळे पडळी आणि पिरळ पूर पाण्याखाली गेल्याने डाव्या तीरावरील गावांचा संपर्क तुटला आहे. पाऊस कायम राहिल्यास दरवाजे खुले होण्याची शक्यता आहे. दरम्यान, काळम्मावाडी धरण क्षेत्रावर अतिवृष्टी असल्याने वक्राकार दरवाजे पुन्हा २५ सेंटीमीटरने उचलले आहेत.
काल राधानगरी धरणाचे सातपैकी चार दरवाजे खुले झाले होते. पैकी रात्री दोन बंद झाले असल्याने विसर्ग कमी झाला होता, मात्र पुन्हा पावसाने जोर धरल्याने आज सायंकाळी कमाल पातळी ३४७.६० च्या वर गेल्याने पाच वाजता तीन दरवाजे पाठोपाठ खुले झाले. यातून व वीजनिर्मितीसाठी मिळून ८७४० क्युसेक विसर्ग भोगावतीत सुरू आहे.
आज दिवसभर अतिवृष्टी कायम राहिल्याने सकाळपासूनच्या दहा तासांत ९२ मिमी पावसाची नोंद झाली. कालपासून आज सकाळपर्यंतच्या २४ तासांत ९० मिमी पाऊस झाला आहे.
दरम्यान, काळम्मावाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार वृष्टी सुरू आहे. या परिसरात २४ तासांत १६२ मिमी पावसाची नोंद झाली. सकाळपासूनच्या दहा तासांत ७० मिमी पाऊस झाला. यामुळे हे धरण ८५.३२ टक्के म्हणजे २१.६७ टीएमसी भरले आहे. धरणाच्या जलाशयात पाण्याची आवक सुरू झाल्याने पाचही वक्राकार दरवाजे पन्नास सेंटीमीटरने उचलले आहेत. त्यातून सध्या ५१५५ पाण्याचा विसर्ग नदी सुरू आहे. दरवाजातून ३९५५ व वीजनिर्मितीसाठी १२०० क्युसेक विसर्ग सुरू आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Yel22b04633 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..