कागल ४ स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागल ४ स
कागल ४ स

कागल ४ स

sakal_logo
By

‘राधानगरीला नगरपंचायत दर्जा द्या’
राधानगरी : राधानगरी ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा देण्याची मागणी नगरपंचायत कृती समितीने केली आहे. या मागणीचे निवेदन ग्रामपंचायत सदस्य शत्रुघ्न सांगावकर, जयश्री कळमकर, सरिता शिंदे, भाग्यश्री पाटील आदींनी तहसीलदार मीना निंबाळकर यांची भेट घेऊन दिले. ऐतिहासिक आणि पर्यटन क्षेत्र असलेले राधानगरी कोल्हापूर, कोकणासह गोवा आणि कर्नाटक राज्याला जोडणाऱ्या राज्य मार्गावरील मध्यवर्ती शहर आहे, राज्य शासनाने २०१४ सालात प्रत्येक तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी नगरपंचायत स्थापनेचा धोरणात्मक निर्णय घेतला, त्यानुसार राधानगरी ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीत करण्याची अधिसूचनाही फेब्रुवारी २०१५ मध्ये जारी झाली. मात्र, तत्कालीन ग्रामपंचायत सदस्यांनी २०१७ सालापर्यंतचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतरच नगरपंचायत अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याची ठरावाद्वारे मागणी केली. त्यामुळे कार्यवाही थांबली. त्यानंतर आजतागायत नगरपंचायतीची स्थापना अधिसूचनेपर्यंतच मर्यादित राहिली आहे. ग्रामपंचायतीच्या ऑक्टोबर २०२१ मधील ग्रामसभेत नगरपंचायत स्थापनेचा ठराव करूनही कार्यवाही सुरू झालेली नाही.

Web Title: Todays Latest Marathi News Yel22b04671 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..