मंत्र्यांना निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंत्र्यांना निवेदन
मंत्र्यांना निवेदन

मंत्र्यांना निवेदन

sakal_logo
By

कर्जमुक्ती योजनेचा
उर्वरितांनाही लाभ द्या
प्रा. जालंदर पाटील यांचे मंत्री पाटील यांना निवेदन
राशिवडे बुद्रुक, ता. १ : महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेमधील त्रुटी दूर करून उर्वरित शेतकऱ्यांना लाभ द्यावा व अल्पभूधारक असलेल्याने रोखीने खते घेणाऱ्या शेतकऱ्यालाही या योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांनी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, ः योजनेंतर्गत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला. यामध्ये १७-१८, १८-१९ व १९-२० मध्ये दोन वेळा कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ होत असला, तरी २०२० मध्ये परतफेडची तारीख ३० ऑगस्ट आहे व उचलीची मुदत ३१ मार्च २०२० आहे. ती वाढवून ३० जून अखेर करावी. कारण मार्च २० मध्ये कोरोनामुळे व्यवहार ठप्प होते. परिणामतः जिल्ह्यातील ९२ हजार ८८ शेतकरी यापासून वंचित राहतात. शिवाय या जिल्ह्यातील अनेक शेतकरी अत्यल्पभूधारक असल्याने बहुतांशी शेतकरी रोखीने खते घेतात. त्यांच्यावरही याचा अन्याय होतो, त्यांनाही लाभ मिळावा.
कोल्हापूरसह महाराष्ट्रात पाणीपुरवठा व कृषी पूरक संस्थांसाठी शेतकऱ्यांचे सातबारा तारण असतात. अनेक संस्था थकबाकीत गेल्याने शेतकरी ही थकबाकीदार ठरला आहे. जिल्हा बँका अशा शेतकऱ्यांना कर्ज देत नाहीत. त्यांच्यावरही अन्याय झाला आहे. याचा पुन्हा विचार करून कर्जमाफी योजनेचा लाभ द्यावा, असेही पाटील यांनी नमूद केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Yel22b04673 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..