राधानगरी एमआयडीसी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राधानगरी एमआयडीसी
राधानगरी एमआयडीसी

राधानगरी एमआयडीसी

sakal_logo
By

राधानगरीत एमआयडीसी
उभारणीसाठी बैठक घ्‍या

मुख्यमंत्री शिंदे यांनी निर्देश; आबिटकर यांची माहिती

राधानगरी, ता. ८ : राधानगरी तालुक्याचा औद्योगिकदृष्ट्या विकास करण्यासाठी औद्योगिक वसाहत उभारणी करण्यासाठी उद्योगमंत्र्यांनी बैठकीचे आयोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. आमदार प्रकाश आबिटकर यांच्या निवेदनामुळे हा प्रश्न मार्गी लागणार असल्याची माहिती पत्रकाद्वारे कार्यकर्त्यानी दिली आहे. पत्रकात म्हटले आहे : कोल्हापूरपासून ५० किलोमीटर राधानगरी तालुका असून तालुक्यात कोणताही औद्योगिक प्रकल्प नाही. दाजीपूर वन्यजीव अभायारण्य असल्याने बहुतांशी क्षेत्र अभयारण्याच्या कार्यकक्षात येते. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या सह्याद्री पर्वत रांगातील इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये तालुक्यातील ठराविक क्षेत्र समाविष्‍ट असल्याने औद्योगिकीकरणास मर्यादा येत आहेत. त्यामुळे येथील सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगारासाठी जिल्ह्यांसह अन्य मोठ्या शहरांत जावे लागते. राधानगरी तालुक्यात औद्योगिक प्रकल्प उभारणी करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली असून याबाबत तत्काळ मुख्यमंत्री महोदयांनी निर्देश देत उद्योगमंत्री यांनीने बैठकीचे आयोजन करून पुढील योग्य ती कार्यवाही करावी असे आदेश दिलेले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Yel22b04689 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..