पोलीसांना निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलीसांना निवेदन
पोलीसांना निवेदन

पोलीसांना निवेदन

sakal_logo
By

बदनामीकारक मजकूर व्हायरल
करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
राशिवडे बुद्रुक : येथील गणेशोत्सवाबाबत चुकीचा व्हायरल केलेला मजकूर आणि यातून आमदार प्रकाश आबिटकर व गावची होणारी बदनामीची चौकशी करून हा मजकूर व्हायरल करणाऱ्याचा शोध घ्यावा व त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी. अशा आशयाचे निवेदन माजी सरपंच सागर धुंदरे व शंभरवर कार्यकर्त्यांनी राधानगरी पोलिस ठाण्यात निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे, गणेशोत्सव नेहमीप्रमाणे चांगला झाला. सर्व लोकप्रतिनिधींनी भेटी दिल्या. असे असताना आमदार आबिटकर यांच्या बद्दल बदनामीकारक मजकूर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये काहीही तथ्य नाही. यातून गावची व आमदार आबिटकर यांची नाहक बदनामी होत आहे. याची सखोल चौकशी करून दोशींवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे. निवेदनावर रमाकांत तोडकर, प्रकाश धुंदरे आदींसह कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.


असळज येथील मॉलमध्ये चोरी
असळज : येथील मॉलच्या छताचा सिमेंट पत्रा फोडून दोन चोरट्यांनी रोकडसह २६ हजार ५०० रुपयांचे साहित्य पळविले. रविवारी मध्यरात्री हा चोरीचा प्रकार घडला आहे. गगनबावडा पोलिसांत नोंद झाली आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी : कोल्हापूर- गगनबावडा प्रमुख मार्गावर असळज कॅन्टीन येथे राधा कृष्णाज शुभ मार्ट हा मॉल आहे. रविवारी मध्यरात्री दोन चोरट्याने मॉलच्या छताचा सिमेंटचा पत्रा व सिलिंग फोडून आतमध्ये उतरले. मॉलचे मागील बाजूस लाकडी दरवाजा आतून उघडून मॉलमध्ये प्रवेश केला. मॉलमधील रोकड ८००० रुपये, १२५०० किंमतीचा सीपीयू, २००० किमतीचा युपीएस व ४००० किमतीचा इन्व्हर्टर अशा रोख रक्कमेसह एकूण २६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. फिर्याद सौरभ भिकाजी बांडागळे यांनी गगनबावडा पोलिसांत दिली आहे. अधिक तपास गगनबावडा पोलीस करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Yel22b04700 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..