राधानगरी नगरपरिषद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राधानगरी नगरपरिषद
राधानगरी नगरपरिषद

राधानगरी नगरपरिषद

sakal_logo
By

राधानगरी नगरपंचायतीचा प्रस्ताव द्या
मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश; आमदार प्रकाश आबिटकर यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा
सकाळ वृत्तसेवा
राधानगरी, ता. २१ : राधानगरी शहराचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर करावे, अशी मागणी असून आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासह शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभागाचे प्रधान सचिवांना राधानगरी नगरपंचायतसाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली.
राधानगरी हे कोल्हापूर कोकणसह गोवा व कर्नाटक राज्यांना जोडणारे मध्यवर्ती ठिकाण आहे. येथे तहसील कार्यालय, पोलिस ठाणे, भूमी अभिलेख, पंचायत समिती, उपअभियंता बांधकाम, उपअभियंता महावितरण, दुय्यम निबंधक, तालुका कृषी अधिकारी यांच्यासह सर्वच शासकीय विभागांची कार्यालये आहेत. सध्या ग्रामपंचायत अस्तित्वात असून, २०११ च्या जनगननेनुसार ग्रामपंचायतीची लोकसंख्या अंदाजे ६२०० इतकी आहे. ग्रामपंचायत सदस्य संख्या १५ अधिक १ आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी व सरपंच, सदस्य व ग्रामस्थांकडून नगरपंचायतीची मागणी होत आहे. त्याअनुषंगाने शिष्टमंडळाने आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासमवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे, विजय ढेरे, तानाजी चौगले, मारुती टिपुगडे, सुरेश पाटील, दीपक शेट्टी, अनिल बडदारे, सुहास निंबाळकर, राम कदम, सतीश फणसे, सुरेश आरडे, संजय तायशेटे, तानाजी कुंभार, सुरेश आडसूळ, युवराज कुंभार, संदीप चौगले, संजय कुंभार, शरद केरकर, मयूर पोवार, राहुल ढेरे, गणेश लाड यांच्यासह प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांकडून
अहवाल मागवणार
मुख्यमंत्री शिंदे यांनी राधानगरी नगरपंचायतीसाठी प्रस्ताव तत्काळ सादर करण्याच्या सूचना नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांना केल्या. याबाबतचा स्वयंस्पष्ट अहवाल नगरविकास विभाग जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रस्ताव मागवून यापुढील धोरणात्मक निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल. त्यामुळे राधानगरी नगरपंचायत करण्याचा मार्ग आता सुकर झाला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Yel22b04716 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..