पिके धोक्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिके धोक्यात
पिके धोक्यात

पिके धोक्यात

sakal_logo
By

03099
कोदवडे : पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने आलेले भात पीक हातचे जाण्याची भीती आहे.
--------------------------

पिके धोक्यात
राशिवडे परिसरातील डोंगरमाथ्यावरील चित्र ः दमदार पावसाची अपेक्षा
राशिवडे बुद्रुक, ता. ६ : पंधरा दिवसांपासून पावसाने पूर्ण दडी मारल्याने राशिवडे परिसरातील डोंगरमाथ्यावरील पिकांना मोठ्या पावसाची गरज भासत आहे. अधूनमधून कधीतरी येणारा शिडकाव्याने पिकांची तहान भागत नसल्याने ही पिके धोक्यात आली आहेत.
मुळातच यंदा पावसाने तब्बल महिनाभर उशिरा सुरुवात केल्यामुळे डोंगर माथ्यावरील शिवारात भात टोकणी, रोप लागण, भुईमुग पेरणी, नाचणी मांडणी हे उशिरा झाले. जुलैनंतर पावसाने दमदार सुरुवात केली. याचा परिणाम पिके चांगली येण्यात झाला असला तरी सध्या ही पिके पोटरीच्या अवस्थेत आहेत. काही ठिकाणी भात बाहेर पडले असले तरी पूर्ण क्षमतेने यामध्ये ताकद जाणवत नाही. अशा परिस्थितीत सध्या दमदार किंवा मोठ्या पावसाची गरज आहे.
सलग दोन तास दमदार पाऊस पडल्यास या पिकांना फायदेशीर ठरू शकतो. मात्र क्वचितप्रसंगी येणारा शिडकावा हा अधिकच धोक्याचा ठरत आहे. सद्यस्थितीत डोंगर माथ्यावरील सर्व पिके निम्मे अर्धी हातची गेली आहेत. आता एखादा दमदार पाऊस झाल्यास उर्वरित पीक तरी हातात मिळावे; अशी बळीराजाची अपेक्षा आहे. यातूनच त्याचे डोळे आभाळाकडे लागले आहे. राशिवडे परिसरातील येळवडे, कोदवडे, वाघवडे, मोहडे, चाफोडी, पुंगाव, चांदे परिसरात डोंगरमाथ्यावरची ही स्थिती आहे.