विसर्ग वाढवला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विसर्ग वाढवला
विसर्ग वाढवला

विसर्ग वाढवला

sakal_logo
By

काळम्मावाडीतील पाणीसाठा
चार टीएमसीने कमी करणार

गळती रोखण्यासाठीच्या ग्राऊंटिंग कामासाठी नियोजन

राधानगरी ता. ९ : काळम्मावाडी धरणातील पाणीसाठा १५ ऑक्टोबरपर्यंत जवळपास चार टीएमसीने कमी करण्यात येणार आहे. गळती रोखण्यासाठीच्या प्रस्तावित ग्राऊंटिंग कामासाठी पाणीसाठा कमी करण्यात येत आहे. सध्या धरणाचे पाचही वक्राकार दरवाजे २५ सेंटीमीटरने उघडून प्रतिसेकंद ३००० क्युसेक्स पाणी विसर्ग सुरू आहे. गेल्या २३ वर्षांत यंदा पहिल्यांदाच हे धरण पूर्ण भरणार नाही.
धरणात १९९९ पासून पूर्ण क्षमतेने (२५.४० टीएमसी) पाणीसाठा करण्यास प्रारंभ झाला; मात्र धरणात शंभर टक्के पाणीसाठा होणार नसल्याची ही पहिलीच वेळ आहे. यंदा धरणात ७८% इतकाच पाणीसाठा राहणार आहे. आजमितीस धरण ९० टक्के भरले आहे. २३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. हा पाणीसाठा सांडवा पातळीपेक्षा साडेतीन टीएमसीने अधिक आहे. तितकाच पाणीसाठा कमी करून ते सांडवा पातळीपर्यंत म्हणजे १९.७० टीएमसी ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी धरणाच्या वक्राकार दरवाजातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
सांडवा पातळीपर्यंतच्या अधिकच्या पाणीसाठ्यात आगामी आठवड्याभरात टप्प्याटप्प्याने घट होणार आहे. धरणात सध्या ६४४ मीटरपर्यंत पाणीसाठा झाला आहे. पाणी पातळी १५ ऑक्टोबरपर्यंत ६४१ मीटर इतकी राहील, असे यंदाचे पाणीसाठ्याचे नियोजन आहे. साठ्याच्या नियोजनामुळे पुढील वर्षी मे महिन्यात प्रस्तावित ग्राऊंटिंग काम सुरळीतपणे अधिक पाणीसाठ्याचा अडसर न येता सुरू होणार आहे. गतवर्षी मे अखेरीपर्यंत धरण पाणीसाठ्यात ६११ मीटरपर्यंत घट झाली नाही. परिणामी ग्राउंटिंग काम लांबणीवर पडले. यामुळे यंदाच्या पावसाळ्यातच धरणात सांडवा पातळीपर्यंत पाणीसाठ्याचे नियोजन जलसंपदा विभागाने आखले आहे. त्यानुसारच धरणातून पूर्ण साठा होण्यापूर्वीच पाणी विसर्ग सुरू करण्यात आला आहे.