हिंदी दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हिंदी दिन
हिंदी दिन

हिंदी दिन

sakal_logo
By

राधानगरी महाविद्यालयात हिंदी दिन
राधानगरी ः हिंदी देशाची सुसंस्कृत भाषा असल्याचे प्रतिपादन माजी प्राचार्य के. आर. पाटील यांनी केले. राधानगरी महाविद्यालयात हिंदी विभागातर्फे ‘हिंदी दिवस’निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डी. एस. मोरस्कर होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार भगवानराव साळुंखे उपस्थित होते. हिंदी भाषा दुर्लक्षित राहिल्यानेच अनेककांना ती धडपणे बोलता येत नाही. देशभ्रमंतीत हिंदी भाषा महत्त्वाची आहे, असे मत माजी आमदार साळुंखे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमात प्राचार्य मोरस्कर यांचेही भाषण झाले. हिंदी विभागप्रमुख डॉ. एकनाथ पाटील यांनी प्रस्तावित केले. प्रा. ए. एम. कांबळे यांनी आभार मानले. प्रा.ज्योती इंगवले यांनी सूत्रसंचालन केले.यावेळी प्रा. बी. के. पाटील, प्रा. राहुल वास्कर आदींसह हिंदी विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते.