निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निवेदन
निवेदन

निवेदन

sakal_logo
By

‘पेन्शन दिवाळीपूर्वी जमा करावी’
राशिवडे बुद्रुक : संजय गांधी, श्रावणबाळ, इंदिरा गांधी, अपंग यांना वेगवेगळ्या योजनांतून प्रत्येक महिन्याला दिली जाणारी पेन्शन शासनाने दिवाळीपूर्वी लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करावी. शिधापत्रिकाधारकांसाठी जाहीर केलेले दीपावली किट त्वरित द्यावे, अशी मागणी भारतीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा सरचिटणीस भीमराव कांबळे सरवडेकर यांनी निवेदनाद्वारे केली. शासन संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी पेन्शन योजना, श्रावणबाळ योजना, दिव्यांग व्यक्ती अशा विविध योजनांची पेन्शन दिवाळीपूर्वी केल्यास त्यांची दिवाळी आनंददायी ठरेल. सर्व रेशन दुकानातून आनंदाचा शिधा म्हणून फक्त रू.१०० मध्ये साखर १ किलो, पामतेल १ किलो, रवा १ किलो, चणाडाळ १ किलो व महिन्याचे रेशन देण्याचा निर्णय घेतला. हे कीट दिवाळीपूर्वी वाटप करावे, अशी मागणी श्री. कांबळे यांनी केली.