निवडणूक कार्यक्रमातून राधानगरीला वगळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निवडणूक कार्यक्रमातून राधानगरीला वगळा
निवडणूक कार्यक्रमातून राधानगरीला वगळा

निवडणूक कार्यक्रमातून राधानगरीला वगळा

sakal_logo
By

निवडणूक कार्यक्रमातून
राधानगरीला वगळा
नगरपंचायत कृती समितीची मागणी
राधानगरी, ता. २२ : ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम संभाव्य अधिसूचनेतून राधानगरी ग्रामपंचायतीला वगळण्याची मागणी आज झालेल्या सर्वपक्षीय नगरपंचायत कृती समितीच्या बैठकीत करण्यात आली. अध्यक्षस्थानी कृती समिती अध्यक्ष तथा सरपंच कविता शेट्टी होत्या.
राधानगरी नगरपंचायत स्थापनेच्या अधिसूचनेची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. नगर विकास विभागाने अधिसूचना जारी करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली आहे. आयोगाच्या संमतीनंतर अधिसूचना जारी होणार आहे. तत्पूर्वीच ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यास नगरपंचायत अधिसूचना बारगळण्याची चिन्हे आहेत. आगामी ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमात राधानगरी ग्रामपंचायतीचा समावेश होऊ नये, यासाठी पालकमंत्री, आमदार, खासदारांसह निवडणूक आयुक्तांना निवेदनाद्वारे साकडे घालण्याचा निर्णयही बैठकीत झाला. राज्य निवडणूक आयोगाने अपवादात्मक परिस्थितीचा विचार करून राधानगरी नगरपंचायत अधिसूचनेला संमती देण्यासाठी पालकमंत्र्यांनी पाठपुरावा करण्याबाबतही निवेदन सादर करण्यात येणार आहे.
बैठकीत ‘गोकुळ’चे संचालक अभिजित तायशेटे, दीपक शेट्टी, तानाजी चौगले, सुहास निंबाळकर, अनिल बडदारे, संजय माळकर, शशिकांत बैलकर, महेश निले, राजेश पाटील, राजेंद्र चव्हाण, जनार्दन पाटील आदींनी मते मांडली. या वेळी माजी सरपंच विजय ढेरे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सतीश फणसे, सुरेश आरडे, अनिल तायशेटे, संजय तायशेटे, मारुती टेपुगडे, कृष्णा कांबळे, राम कदम, एम. के. चव्हाण, युवराज पाटील, विक्रम पालकर, सचिन पालकर, मंगेश चौगले उपस्थित होते.