बक्षीस वितरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बक्षीस वितरण
बक्षीस वितरण

बक्षीस वितरण

sakal_logo
By

03111
ठिकपुर्ली : महिलांना भेट देताना दत्तात्रय मेडसिंगे व सुनील चौगले.
--------------

ठिकपुर्लीत गरजूंना फराळाचे साहित्य वाटप
राशिवडे बुद्रुक, ता. २३ : ठिकपुर्ली (ता. राधानगरी) येथील जोतिर्लिंग महिला बचत गटप्रणित रास्त भाव धान्य पुरवठा दुकानातर्फे सामाजिक बांधिलकी जपत बचत गटातील सदस्यांना आणि गरजू गरीब महिलांना दीपावलीनिमित्ताने जीवनावश्यक वस्तूंचे व फराळाचे साहित्य वाटप झाले. भाजपाचे जिल्हा चिटणीस व भोगावती कारखान्याचे संचालक दत्तात्रय मेडसिंगे यांच्या हस्ते वाटप झाले. अध्यक्षस्थानी महालक्ष्मी दूध संस्थेचे अध्यक्ष सुनीलराव चौगले होते.
जोतिर्लिंग महिला गट महिलांच्या गृहोद्योग व्यवसायासाठी नेहमी प्रोत्साहन देते. सामाजिक बांधिलकीपोटी विविध उपक्रम राबवतात. या गटाचे काम इतर गटांसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन श्री मेडसिंगे यांनी व्यक्त केले. यावेळी यशस्वी महिलांचा सत्कार झाला, तर सदस्यांना भेटवस्तूंचे वाटप झाले.
कार्यक्रमाला गटाच्या अध्यक्षा सुवर्णा चौगले, सदस्या सुनीता कदम, शीतल कदम, सुवर्णा देवकर, ज्योती शिंदे, शारदा म्हाळूंगेकर, सरिता मळगे, सुनीता चौगले, तर पांडुरंग कदम, योगेश पाटील, जयवंत शिंदे, सर्जेराव कदम, बाजीराव पाटील, वैभव चौगले, सर्जेराव चौगलेंसह महिला उपस्थित होत्या. आभार पांडुरंग कदम यांनी मानले.