निवडणुकीवरील बहिष्कारसाठी राधानगरीत सहमती पत्राची मोहीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निवडणुकीवरील बहिष्कारसाठी राधानगरीत सहमती पत्राची मोहीम
निवडणुकीवरील बहिष्कारसाठी राधानगरीत सहमती पत्राची मोहीम

निवडणुकीवरील बहिष्कारसाठी राधानगरीत सहमती पत्राची मोहीम

sakal_logo
By

निवडणुकीवरील बहिष्कारसाठी
राधानगरीत सहमती पत्राची मोहीम
नगरपंचायत सर्वपक्षीय कृती समितीचा पुढाकार
राधानगरी, ता. २३ : राधानगरी ग्रामपंचायत आगामी निवडणुकीवर बहिष्कारच्या निर्णयावर ठाम राहण्यासाठी गावातील सर्व मतदारांचे सहमती पत्र घेण्याची मोहीम सर्वपक्षीय कृती समितीने हाती घेतली.
राधानगरी नगरपंचायत स्थापनेची अधिसूचना जारी होण्यापूर्वी यदाकदाचित ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम घोषित झाला. तर ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कारचा निर्णय कृती समितीने घेतला आहे. या निर्णयाला सहमती दर्शविणारे लेखी पत्र गावातील जवळपास साडेचार हजार मतदारांकडून घेतली जाणार आहेत. लोकसहभाग आणि पाठबळासाठी सहमती पत्रावर घरोघरी जाऊन प्रत्येक मतदारांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जाणार आहेत. दरम्यान, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायत नागरी अधिनियम १९६५ च्या कलम ३४१ क नुसार राज्य शासनाला ग्रामीण क्षेत्रामधून नागरिक क्षेत्रात संक्रमित होणारे क्षेत्र अधिसूचनेद्वारे नगरपंचायत घोषित करता येईल, अशी तरतूद आहे. या तरतुदीनुसार शासन अधिकार असून, ती निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. या तरतुदीनुसार राधानगरी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन असल्याचे नगरविकास विभागाने राज्य निवडणूक आयोगाला पाठविलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे. त्यानुसार अधिसूचना जारी करण्यास आयोगाची संमती मागितली आहे.