राधानगरी पाणी योजना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राधानगरी पाणी योजना
राधानगरी पाणी योजना

राधानगरी पाणी योजना

sakal_logo
By

राधानगरीत ४२ पाणी योजनांचे काम
१२७ निविदा प्रक्रियेच्या टप्प्यावरच; मार्च २०२४ पर्यंत पूर्णत्वाचे नियोजन

राधानगरी ता. १ : जल जीवन मिशन अंतर्गत राधानगरी तालुक्यात प्रस्तावित करण्यात आलेल्या १६९ नळपाणी पुरवठा योजनांपैकी सद्यस्थितीत ४२ योजनांची कामे सुरू झाली आहेत. अद्याप १२७ योजना निविदा प्रक्रियेच्या टप्प्यावरच राहिल्या आहेत.
जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडील तांत्रिक मनुष्यबळाच्या कमतरतेने योजनांच्या निविदा प्रक्रिया रखडतच सुरू राहिल्या. नोव्हेंबरमध्ये उर्वरित योजनांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण होणार आहेत. सर्व प्रस्तावित योजनांची कामे मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्याची नियोजन केले आहे. एक कोटी खर्चापर्यंतच्या योजनासाठी एक वर्ष तर दोन कोटींपेक्षा अधिक खर्चाच्या योजनांसाठी दोन वर्षे काम पूर्ण करण्याचा कालावधी निश्चित केला आहे. उर्वरित १२७ योजनांची निविदा प्रक्रिया नजीकच्या काळात पूर्ण झाली तरच नियोजनानुसार मार्च २०२४ पर्यंत प्रत्यक्षात योजना पूर्णत्वास जातील. यातील ७१ गावांच्या नळ पाणीपुरवठा योजनांसाठी सौरऊर्जेचा वापर होणार आहे. नैसर्गिक झराच्या पाणी स्त्रोत असणाऱ्या ४१ योजनांच्या कामासाठी वन्यजीव विभागाची परवानगी गरजेची आहे. हे नैसर्गिक झरे वन्यजीव क्षेत्रात आहेत. वन्यजीव विभागाकडे परवानगीसाठी प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश संबंधित ग्रामपंचायतींना दिले आहेत.

योजना काम सुरू झालेली गावे -
मांगेवाडी, मालवे, मोघर्डे, तुरंबे, चंद्रे, बारडवाडी, चक्रेश्वरवाडी, मुसळवाडी, कुंभारवाडी, पनोरी, करंजफेण, माजगाव, तारळेखुर्द, पंडेवाडी, पिंपळवाडी, कंथेवाडी, सरवडे, चांदे, पालखुर्द, घोटवडे, खामकरवाडी, चांदेकरवाडी, सावर्डे पाटणकर, पालकरवाडी, तरसंबळे, पिरळ, कपिलेश्वर, आवळी बुद्रुक, कोते, आपटाळ, कासारपुतळे, गवशी, आणाजे, मानेवाडी, गोतेवाडी, पाल बुद्रुक, मालपवाडी, कुदळवाडी, कळंकवाडी.


निविदा प्रक्रियेतील योजना -
चापोडी तर्फे ऐनघोल, तळगाव,हेळेवाडी,आडोली, दुबळेवाडी,तोरस्करवाडी, जळकेवाडी,आडसूळवाडी, गावठाणवाडी,बनाचीवाडी, भैरीबांबर,सावरदे, वडाचीवाडी,हळ्याचीवाडी, बागलवाडी,हेळेवाडी,सिरसे, कोदवडे,घुडेवाडी,तळाशी, पुंगाव,डिगेवाडी,मिसाळवाडी, दळवेवाडी,कासारवाडी, जोंधळेवाडी,मोहडे,आकनुर, राधानगरी,राशिवडे खुर्द, ऐैनी,पडसाळी,चव्हाणवाडी, सोनारवाडी,वाणेवाडी, सोळांकुर,बरगेवाडी, धामणवाडी,हणबरवाडी, कौलव,भोपळवाडी, दूधगंगानगर,फराळे, लिंगाचीवाडी,काळम्मावाडी, राजापूर,मौजे कासारवाडा, रामणवाडी,केळोशी बुद्रुक, केळोशी खुर्द,धामोड लाडवाडी,कुरणेवाडी,वाघवडे,आटेगाव,म्हासुरली, जोगमवाडी,राशिवडे बुद्रुक, मल्लेवाडी,फेजिवडे, अवचिवाडी,इब्राहिमवाडी रामाचीवाडी,मानबेट,राई, चौके,कंदलगाव, हसणे, मांडरेवाडी,शेळप,बांबर, कदमवाडी,तांबेवाडी, अर्जुनवाडा,मजरे कासारवाडा,मांगोली,नरतवडे शिरगाव,येळवडे,बुरंबाळी,न्यू करंजे,दाऊतवाडी,सोन्याची शिरोली,कुडुत्री,सुळंबी भटवाडी,ओलवण, शिवाची वाडी,माळेवाडी,खिंडी व्हरवडे,काटीवडे, राणोशीवाडी,राऊतवाडी, गुडाळ,गुडाळवाडी,पाट पन्हाळा,आमजाई व्हरवडे, ठीकपूर्ली,दुर्गमानवाड योजनाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

ांांाकोट
अभयारण्य क्षेत्रातील पुनर्वसित झालेले एजिवडे वगळता तालुक्यातील सर्व गावांना (वाड्यावस्त्यांसह) योजना प्रस्तावित आहेत. १२७ योजनांची निविदा प्रक्रिया बाकी आहे. ती १५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल. सर्व योजनांची कामे मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. खर्चानुसार काम पूर्णत्वाची मुदत निश्चित टप्प्यात आली आहे.
- वैजनाथ कराड, उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग, राधानगरी