राशिवडे बुद्रुकमध्ये शेतकरी संवाद कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राशिवडे बुद्रुकमध्ये शेतकरी संवाद कार्यक्रम
राशिवडे बुद्रुकमध्ये शेतकरी संवाद कार्यक्रम

राशिवडे बुद्रुकमध्ये शेतकरी संवाद कार्यक्रम

sakal_logo
By

राशिवडे बुद्रुकमध्ये
शेतकरी संवाद कार्यक्रम
राशिवडे बुद्रुक : कै. दादासाहेब पाटील कौलवकरांनी भोगावतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे संसार उभारले. त्याच साखर कारखान्याला गतवैभव प्राप्त करून देऊ, असे प्रतिपादन भोगावतीचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील कौलवकर यांनी केले. ते येथे कै. दादासाहेब पाटील कौलवकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित शेतकरी संवाद कार्यक्रमामध्ये बोलत होते. अध्यक्षस्थानी यशवंत सेवा संस्थेचे सुभाष पाटील होते. ते म्हणाले, ‘‘भोगावती कारखान्याच्या उभारणीने शेतकरी, कामगार, व्यापारी, वाहनधारक, तोडणी मजूर आदी घटकांच्या जीवनामध्ये सुखाचे दिवस आले. सध्या कारखाना अर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे कारखाना वाचविण्यासाठी सर्वांची साथ मोलाची आहे.’’ या वेळी निवृत्त कामगारांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. तानाजी ढोकरे, चंद्रहार पाटील, संजय डोंगळे, राशिवडेचे माजी सरपंच प्रकाश चौगले, प्रकाश पाटील, प्रभाकर कानकेकर उपस्थित होते. येळवडे येथील कार्यक्रमाला तानाजी पाटील, एस. एन. पाटील, शंकरराव मिसाळ आदी उपस्थित होते.