भोगावती कारखान्याने एफआरपी जाहीर करावी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोगावती कारखान्याने एफआरपी जाहीर करावी
भोगावती कारखान्याने एफआरपी जाहीर करावी

भोगावती कारखान्याने एफआरपी जाहीर करावी

sakal_logo
By

03115
भोगावती : स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जनार्दन पाटील यांच्याकडून निवेदन स्वीकारताना ‘भोगावती’चे प्रभारी कार्यकारी संचालक संजय पाटील. या वेळी उपस्थित कार्यकर्ते.

भोगावती कारखान्याने
एफआरपी जाहीर करावी

‘स्वाभिमानी’चे निवेदन; थकीत हप्त्याचीही मागणी

राशिवडे बुद्रुक, ता. २ : भोगावती सहकारी साखर कारखान्याने एफआरपी जाहीर करावी, मागील २०० चा थकीत हप्ता ताबडतोब देऊन गळीत हंगाम करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आज निवेदनाद्वारे कारखाना प्रशासनाकडे केली.
निवेदनात म्हटले आहे, ‘भोगावती’ने यंदाचा ऊसदर अद्याप जाहीर केलेला नाही. गतवर्षीचा सरासरी साखर उतारा १२.५० टक्के आहे. त्यानुसार ऊस तोडणी व वाहतूक खर्च रुपये ५९४ वजा करून प्रतिटन रुपये ३१२४ ऊसदर होतो. तसा पहिला हप्ता जाहीर करावा व यावर्षीचा ऊस गळीत हंगाम वेळेत चालू करावा. सर्वसाधारण सभेत मंजूर म्हणणारे हितचिंतक ऊस बाहेरच्या साखर कारखान्याला पाठवत आहेत. त्याचीही चौकशी करावी.
मागील प्रतिटन २०० रु. व सभासदांची ६४ महिन्यांतील सवलत साखर ताबडतोब द्यावी. संघटनेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील यांच्या हस्ते मागण्यांचे निवेदन प्रभारी कार्यकारी संचालक संजय पाटील यांना दिले. मागण्यांची पूर्तता यावर्षीच्या ऊस गळीत हंगाम प्रारंभापूर्वी करावी. अन्यथा ऊसतोड बंद आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे. 
निवेदन देताना जनार्दन पाटील यांच्यासह आण्णाप्पा चौगले, विलास पाटील, रंगराव पाटील, रावसाहेब डोंगळे, साताप्पा पाटील, शामराव टिपुगडे, तुकाराम सुतार, कृष्णात मोगणे उपस्थित होते.