पेप्सी दरवाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पेप्सी दरवाढ
पेप्सी दरवाढ

पेप्सी दरवाढ

sakal_logo
By

एक रुपयाची पेप्सी
बंद करण्याचा निर्णय

राशिवडे बुद्रुक, ता. ९ : उत्पादन खर्च आणि वाढलेले वीजबिल यामुळे उत्पादनावर परिणाम झाला असल्याने आता एक रुपयाची पेप्सी बंद करण्याचा निर्णय कोल्हापूर व सांगली जिल्हा पेप्सी उत्पादक असोसिएशनने घेतला आहे. यामुळे नाममात्र किमतीतील चिमुकल्यांचा गारवा आता महागणार आहे.
या पेप्सी आता दोन-तीन आणि पाच रुपयाच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध होणार आहेत. याबाबत कुरुकली (ता. करवीर) येथे झालेल्या असोसिएशनच्या बैठकीत सर्वसमावेशक निर्णय घेण्यात आला. अनेक वर्षापासून एक रुपयांमध्ये थंडगार पेप्सी उपलब्ध होत होती. दिवसेंदिवस वाढणारा उत्पादन खर्च व वाढलेले वीजबिल यामुळे एक रुपयाचे उत्पादन आता परवडत नाही. त्याऐवजी दोन तीन आणि पाच रुपयाची पॅकिंग बनविण्यात येणार आहे. यावर दोन्ही जिल्ह्यातील उत्पादकांचा एकमुखी निर्णय झाला.
या बैठकीला असोसिएशनचे अध्यक्ष सचिन पाटील, उपाध्यक्ष राजेंद्रकुमार चौगुले (आष्टा), महेश पाटील, बाळकृष्ण पाटील, सुहास हजारे, सुरेश कदम, विठ्ठल जांभळे, प्रशांत पाटील, सह्याद्री क्षीरसागर, रणजित टिटवे, महादेव जगदाळे, अतुल बोंबाडे, संजय कदम, रमेश जाधव, राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते. प्रास्ताविक व स्वागत राजेंद्र पाटील यांनी केले. प्रशांत पाटील यांनी आभार मानले.