मनसे निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मनसे निवेदन
मनसे निवेदन

मनसे निवेदन

sakal_logo
By

राधानगरी तहसीलमधील पदे
भरण्यासाठी मनसेचे निवेदन
राधानगरी, ता. ११ : राधानगरी तहसील कार्यालयातील तीन नायब तहसीलदार पदांसह इतर पदे रिक्त आहेत. ही पदे तत्काळ भरावीत, अशा मागणीचे निवेदन मनसेच्या वतीने तालुकाध्यक्ष राजेंद्र चव्हाण यांनी प्रभारी नायब तहसीलदार प्रदीप गुडाळे यांना दिले.
येथे तीन नायब तहसीलदारसह लिपीक, तलाठी आणि शिपाईपद रिक्त आहे. अशातच ६६ ग्रामपंचायतींच्या मतदानाचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. राधानगरी तालुका वाकीघोलापासून ते म्हासुर्ली, दाजीपूर अशा दुर्गम भागात विखुरलेला आहे. तालुक्यात १२२ महसुली गावे आहेत. दोन वर्षांपासून महसूल, निवासी आणि निवडणूक नायब तहसीलदार अशी तीन नायब तहसीलदार पदे रिक्त आहेत. यामुळे अव्वल कारकून आणि इतर कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे. दुर्गम भागातून येणाऱ्या नागरिकांना ताटकळत थांबावे लागते. शैक्षणिक दाखले, पी. एम. किसान यादीची दुरुस्ती, जमाबंदी आदेश अशी दैनंदिन कामे करावी लागतात. याचा विचार करून रिक्त पदे भरावीत अन्यथा आंदोलन करू, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी मनसे तालुकाध्यक्ष राजेंद्र चव्हाण, युवराज येडूरे, शहराध्यक्ष राजेश पाटील, उत्तम चव्हाण, रोहित कानकेकर, मारुती सातपुते, जगदीश पाटील, तुकाराम कांबळे, अमित कोरे, वृषभ आमते, प्रवीण मनुगडे, शहाजी कुंभार उपस्थित होते.