जनता दल निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जनता दल निवेदन
जनता दल निवेदन

जनता दल निवेदन

sakal_logo
By

03148
राधानगरी : तहसीलदार मीना निंबाळकर यांना विविध मागण्यांचे निवेदन देताना पदाधिकारी.


राधानगरीत जनता दलाचा मेळावा
राधानगरी : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जनता दल कार्यकर्त्यांनी स्वतंत्र लढावे. प्रसंगी समविचारी पक्षाशी आघाडी करावी व पक्षाचे ग्रामपंचायत सदस्य वाढविण्याच्या दृष्टीने निवडणुकीची रणनीती आखावी, असे मत जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील यांनी व्यक्त केले. येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. ग्रामपंचायत निवडणुका आणि इतर मागण्यांबाबत चर्चेसाठी मेळावा झाला. अध्यक्षस्थानी बिद्रीचे उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे होते. मेळाव्यात पक्षवाढीसाठी प्रमुख कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन केले. तसेच गायरान जमिनीवरील अतिक्रमण कायम करावे, प्रोत्साहन अनुदान यादी त्वरित घोषित करावी, शेतकऱ्यांना दरमहा पाच हजार पेन्शन द्यावी आदी मागण्या केल्या. मेळाव्यानंतर मागण्यांचे निवेदन तहसीलदार मीना निंबाळकर यांना दिले. मेळाव्याला जनता दलाचे तालुकाध्यक्ष विठ्ठल मुसळे, युवा अध्यक्ष शरद पाडळकर, दत्ता धनगर, शिवाजीराव पाटील, शिवराज खोराटे, सुहास घोलकर उपस्थित होते.