राधानगरी निवडणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राधानगरी निवडणूक
राधानगरी निवडणूक

राधानगरी निवडणूक

sakal_logo
By

राधानगरीत उमेदवारी अर्ज दाखल
-
नगरपंचायतीच्या मुद्यावरून संभ्रम

राधानगरी, ता. १ : येथे नगरपंचायत व्हावी म्हणून बंद पाळला, निवेदन दिले. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. दोन्ही गटांनी स्वतंत्र पत्रकार बैठका घेऊन भूमिका मांडल्या. कृती समितीने अर्ज मागे घेण्याचे आवाहन करत अर्ज मागे न घेतल्यास कृती समितीतील समाविष्ट घटक पक्षही अर्ज भरण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले. अर्ज भरलेल्या आघाडीने नगरपंचायतीला विरोध नाही. मात्र, कृती समिती सर्वपक्षीय नसल्याचे सांगितले.
सर्वपक्षीय नगरपंचायत कृती समितीने काही लोकांनी भरलेले अर्ज मागे घेऊन नगरपंचायतसाठी सहकार्य करण्याचं आवाहन केले. कृती समितीचे अध्यक्ष दीपक शेट्टी म्हणाले, ‘काही लोकांनी उमेदवारी अर्ज भरल्याने कृती समितीतील सर्व पक्षांना उमेदवारी अर्ज भरावे लागणार आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक लादल्याची स्थिती होणार आहे. नगरपंचायतीसाठी माघार घेऊन ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकून नगरपंचायत होण्याचा मार्ग सुकर करावा.’ सुधाकर साळोखे, दत्तात्रय निल्ले, रमेश पाटील उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज भरलेल्या आघाडीनेही भूमिका मांडली. आघाडीचे प्रतिनिधी उमेश शिंदे यांनी नगरपंचायतीसाठी सर्वप्रथम निवेदनाद्वारे आपल्या आघाडीने मागणी केली आहे. याचे श्रेय आम्हाला मिळू नये म्हणून कृती समिती सर्वपक्षीय न करता ठराविक लोकांना समितीत घेतलं आहे. नगरपंचायतीला विरोध नाही. पण, सत्ताधारी नगरपंचायतीचा मुद्दा पुढे करत ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचार लपवत असल्याचा आरोप करत आघाडीची बैठक घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचे सांगितले. राजेंद्र भाटळे, शिवसेना तालुकाप्रमुख उत्तम पाटील, बाळासो कळमकर उपस्थित होते.