निवडणूक यंत्रणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निवडणूक यंत्रणा
निवडणूक यंत्रणा

निवडणूक यंत्रणा

sakal_logo
By

राधानगरी तालुक्यात २११ मतदान केंद्रे
राधानगरी ता. १६ : राधानगरी तालुक्यात निवडणूक होणाऱ्या ५८ ग्रामपंचायतींसाठी २११ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी आदी १०५५ जणांची नियुक्ती केली आहे. तालुक्यात ६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका घोषित झाल्या होत्या. त्यातील पडसाळी, शेळेवाडी, मानबेट, पाटपन्हाळा, सोळांकूर, आपटाळ, ढेंगेवाडी आणि केळोशी बुद्रुक या आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. उर्वरित निवडणुका होणाऱ्या ५८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या जागांसाठी १२१ उमेदवार तर सदस्यपदाच्या ४४४ जागांसाठी ९७५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. निवडणुकीसाठी १ लाख ०५ हजार ३१८ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. ५५ हजार ५९४ पुरुष ४९ हजार ७१७ महिला मतदारांचा समावेश आहे. निवडणूक विभागाने मतदान प्रक्रियेसाठी वीस राखीव पथकांची व्यवस्था ठेवली आहे.