‘हॉलिडे रिसॉर्ट’ होणार ‘थ्री स्टार’ दर्जाचे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘हॉलिडे रिसॉर्ट’ होणार ‘थ्री स्टार’ दर्जाचे
‘हॉलिडे रिसॉर्ट’ होणार ‘थ्री स्टार’ दर्जाचे

‘हॉलिडे रिसॉर्ट’ होणार ‘थ्री स्टार’ दर्जाचे

sakal_logo
By

‘हॉलिडे रिसॉर्ट’ होणार ‘थ्री स्टार’ दर्जाचे
दाजीपूरमध्ये उभारणी; पर्यटन विकास महामंडळाची महत्वकांशी योजना
मोहन नेवडे : सकाळ वृत्तसेवा
राधानगर, ता. २९ : पर्यटन विकास महामंडळाचे महत्वकांशी योजना असलेले दाजीपूरातील ‘हॉलिडे रिसॉर्ट’ आगामी काळात ‘थ्री स्टार’ दर्जाचे होणार आहे. सध्या रिसॉर्टच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. फक्त अंतर्गत कामे बाकी आहेत.ती पुढील तीन महिन्यात पूर्ण होतील. दुसऱ्या टप्प्यात रिसॉर्टच्या विस्तारीकरणाची योजना एमटीडीसीने प्रस्तावित केली आहे.विस्तारीकरणात रिसॉर्टमध्ये ‘थ्री स्टार’ दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यात येणार आहे.
राधानगरी आणि दाजीपूरच्या पर्यटन विकासाला अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या रिसॉर्टचे काम अंतिम टप्प्यात आल्यानंतर तांत्रिक बाबीमुळे रखडले होते. त्यातून अंतर्गत कामे बाकी राहिली. आता तांत्रिक बाबींचा गुंता सुटून सुधारित आराखडा अंदाजपत्रकामुळे पूर्ववत काम सुरू झाले आहे. गेले महिनाभर प्रकल्प स्थळी वीज पुरवठा खंडित असल्याने कामात अडसर आला होता. गेल्या आठवड्यातच वीज पुरवठा सुरळीत झाल्याने,आणि प्रकल्प स्थळी आवश्यक साहित्य,कामगार पोहोचल्याने,गतीने काम सुरू राहणार आहे.यंदाच्या पावसाळ्यापूर्वी रिसॉर्ट पर्यटकांसाठी खुले करण्याची नियोजन एमटीडीसीने आखले आहे.
दाजीपूर अभयारण्याच्या पायथ्याशी आणि धरण जलाशयाच्या लगतचे कोल्हापूरसह तळकोकण गोवा आणि कर्नाटक राज्याला जोडणाऱ्या राज्यमार्गावरील हे रिसॉर्ट नाविन्यपूर्ण ठरणार आहे. ते खुले झाल्यानंतर निश्चितपणे पर्यटकांची वर्दळ वाढती राहणार आहे. या अभ्यासातून मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्याया रिसॉर्टच्या विस्तारीकरणाचे आणि ''थ्रीस्टार'' दर्जाच्या सुविधांचा प्रस्ताव एमटीडीसीच्या विचाराधीन आहे.एकूणच तब्बल एक दशकापासून बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ठरलेल्या रिसॉर्टमुळे राधानगरी-दाजीपूरच्या पर्यटनाला नवा आयाम मिळणार आहे.
------------

एमटीडीसीच्या कब्जात असलेल्या सध्याच्या क्षेत्रातच दुसऱ्या टप्प्यात रिसॉर्टचे विस्तारीकरण होईल. पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण होऊन रिसॉर्ट पर्यटकांसाठी खुले झाल्यानंतर विस्तारीकरणाचा आराखडा ‘थ्री स्टार’ दर्जानुसार आवश्यक सुविधांच्या प्रस्तावचा अंतिम निर्णय होईल. पहिल्या टप्प्यात रिसॉर्टची दुमजली मुख्य इमारत आणि उपहार गृह इमारतीची उभारणी झाली आहे. अंतर्गत बाकी कामे मार्च २०२३ पर्यंत पूर्ण होतील. पहिल्या टप्प्यात रिसॉर्टमध्ये १४ निवासी कक्ष उपलब्ध होणार आहेत. रिसॉर्टच्या पहिल्या टप्प्यासाठी जवळपास चार कोटी खर्च होणार आहेत, तर विस्तारीकरण ''थ्री स्टार'' दर्जासाठी आणखी पाच कोटीपर्यंतचा खर्च अपेक्षित आहे.
- विजय बावधने,कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मुंबई