Wed, Feb 8, 2023

अभयारण्य बंद
अभयारण्य बंद
Published on : 28 December 2022, 2:10 am
दाजीपूर अभयारण्य दोन दिवस पर्यटकांसाठी बंद
राधानगरी ः सरते वर्ष आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राधानगरी दाजीपूर- वन्यजीव अभयारण्य ३१ डिसेंबर आणि एक जानेवारीला पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. या दोन दिवसांत कोणतीही अनुचित घटना होऊ नये, यासाठी वन्यजीव विभागाने पर्यटकांना अभयारण्य क्षेत्रात प्रवेशाला मनाई केली आहे. या काळात अभयारण्य क्षेत्रात विनापरवाना प्रवेश, मद्यपान, प्लास्टिक कचरा करणाऱ्या पर्यटकांवर वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत कडक कारवाईचा इशारा वन्यजीव विभागाने दिला आहे. पर्यटनाला बंदी असल्याने, पर्यटकांनी अभयारण्य क्षेत्रात येऊ नये, असे आवाहन विभागीय वन अधिकारी वन्यजीव एम. एस. पद्मनाभ यांनी केले आहे.