गव्याने जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गव्याने जखमी
गव्याने जखमी

गव्याने जखमी

sakal_logo
By

गव्याच्या हल्ल्यात बांबर
येथे एक जण जखमी
राशिवडे बुद्रुक : हसणेपैकी बांबर येथील प्रकाश महादेव म्हाबळे यांच्यावर गव्याने हल्ला केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून, सीपीआरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शनिवारी दुपारी बांबर येथील घराशेजारीच कच्च्या रस्त्यावरून म्हाबळे हे चालत जात असताना कारवीत उभा असलेल्या गव्याने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. त्यांना प्रथम ग्रामीण रुग्णालय राधानगरी येथे प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी सीपीआर रुग्णालय येथे हलवण्यात आले. त्यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे.