पाच सुवर्णपदके | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाच सुवर्णपदके
पाच सुवर्णपदके

पाच सुवर्णपदके

sakal_logo
By

03249
भक्ती वाडकरला पाच सुवर्णपदके
राशिवडे बुद्रुक : शिवछत्रपती क्रीडा पीठ, पुणे बालेवाडीतील शालेय राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेमध्ये राशिवडेतील जिजाऊ उर्फ भक्ती राहुल वाडकर या जलकन्येने पाच सुवर्णपदके पटकावली. तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. १९ वर्षाखालील स्पर्धा गटातून तिने बाजी मारली असून ५० मीटर १०० मीटर व २०० मीटर बॅक प्रकारासाठी सुवर्णपदके शिवाय फ्री स्टाईल रिले व मिडले रिले प्रकारांतही तिने सुवर्णपदके पटकाविली. तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. मध्य प्रदेशातील खेलो इंडिया स्पर्धेतही तिची निवड झाली आहे. प्रतिकूल परिस्थितीतून जलतरणपटू झालेल्या भक्तीला शासकीय गोदामात हमाली करणाऱ्या वडील राहुल वाडकर यांचे पाठबळ आहे. तिला राष्ट्रीय प्रशिक्षक बालाजी केंद्रे व पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी व प्रभारी उपसंचालक माधव कसगावडे यांचे प्रशिक्षण लाभत आहे.