पर्यटन विकास

पर्यटन विकास

88047
राधानगरी- दाजीपूर अभयारण्य
विकास आराखडा कागदावरच

११० कोटींचा प्रस्ताव; कुटुंब पुनर्वसनाबाबत आनंदच

राधानगरी ता. ९ : राधानगरी- दाजीपूर अभयारण्याचा दर्जा वाढविण्याच्या कार्यवाही प्रत्यक्षात झाली. तरच आगामी काळात अभयारण्य पर्यटन विकास आणि अभयारण्य क्षेत्रातील गावांच्या पुनर्वसनाला भरून निधीची उपलब्धता होणार आहे. सद्यःस्थितीत प्रस्तावित पर्यटन विकास व पुनर्वसन निधी कमतरतेने रखडतच सुरू आहे. अभयारण्याचा पर्यटनदृष्ट्या विकासाचा ११० कोटी रुपये खर्चाचा प्रस्तावित आराखडा कागदावरच राहिला आहे.
अभयारण्याचा दर्जा वाढविण्याची मागणी आमदार सतेज पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात केली होती.अभयारण्याचा दर्जा वाढविण्यासाठी राज्य शासनाकडून कार्यवाही सुरू असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे. मात्र कार्यवाहीचा तपशील स्पष्ट झालेला नाही. अभयारण्याचे तीन दशकांपूर्वीच विस्तारीकरण झाले. मात्र पर्यटन विकास आणि पुनर्वसनासाठी पुरेसा निधी मिळालेला नाही. दर्जा वाढीच्या कार्यवाहीतून निधीचा गुंता सुटण्याची शक्यता वाढली आहे.
अभयारण्य क्षेत्रातील ३० वाड्या वस्त्यातील जवळपास दोन हजार कुटुंबांचे अभयारण्य क्षेत्राबाहेर पुनर्वसन होणार आहे. गेल्या दशकभरात यातील पंधरा टक्के कुटुंबांचेही पुनर्वसन झालेले नाही.हे अभयारण्य सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या उत्तरेस आहे.तर दक्षिणेस गोवा राज्यातील म्हादाई राष्ट्रीय उद्यान आणि कर्नाटकातील भीमगड अभयारण्य व दांडेली व्याघ्र प्रकल्प आहे.या सर्व संरक्षित क्षेत्रांना हे अभयारण्य वन्यप्राणी भ्रमण मार्गाच्या माध्यमातून जोडले गेले आहे. या अभयारण्यात वरील सर्व संरक्षित क्षेत्रात वन्य प्राण्यांचे आवागमन आणि स्थलांतर होत असल्याचे निदर्शनास आले आहे.यातून या अभयारण्याचे वन्यप्राणी संरक्षण व भ्रमण मार्गाच्या दृष्टीने महत्त्व अधोरेखित झाले आहे.
--------------------
चौकट
लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याची गरज
अभयारण्य क्षेत्रातील गावांच्या पुनर्वसनानंतरच या भ्रमण मार्गातील मानवी वस्त्यांचे अडथळे दूर होणार आहेत. भ्रमण मार्ग सुरक्षित राहतील. पुनर्वसन, पर्यटन विकास, भ्रमणमार्ग संवर्धन आणि वन्यप्राणी संरक्षणाला अभयारण्याचा दर्जा वाढ सहाय्यभूत ठरणार आहे. लवकरात लवकर दर्जा वाढ कार्यवाही होण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून पाठपुराव्याची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com